Skip to main content

Posts

Showing posts from September, 2019

"मन करा रे प्रसन्न,सर्व श्रध्देचे कारण"

"मन करा रे प्रसन्न,सर्व श्रध्देचे कारण"   श्रध्दा म्हटल्यावर आपल्याला जास्त काही सांगण्याची गरज नाही.आपण आपल्या देवावरती,आई-वडीलांवरती खुप श्रध्दा ठेवून असतो,थोडा विचार करा.खरच प्रामाणिक आपण श्रध्दा ठेवतो का?स्वतःच्या मनाला विचारा. आजच्या नवयुगात श्रध्दा/विश्वास काय असते तेच मुळात आपण विसरून गेलेलो आहोत.देवावरती असणारी श्रध्दा सुध्दा मोह,लालसा,लोभा पोटी ठेवली जाते.आई-वडीलांच्या बाबत ही असेच काही से आहे.नक्की श्रध्दा काय हेच आपल्याला माहिती नाही.फक्त त्याचा अर्थ आपण जाणतो पण प्रत्यक्षात उतरवत नाही.ज्या वेळी श्रध्दा समजेल तेंव्हा वयोवृध्द आश्रम बंद झाल्या शिवाय रहाणार नाहीत.आपल्या जीवनात मानसिक स्वास्थ्यासाठी श्रध्दा काळाची गरज आहे. श्रध्देची लक्षणे दोन प्रकारे आहेत,एक प्रसन्नता व दूसरी महत्वकांक्षा,आज आपल्याकडे प्रसन्नता आहे का?या धावपळीच्या युगात प्रसन्नताच आपण विसरून गेलेलो आहोत.चेहऱ्यावर दाखवताना माञ प्रसन्न/आनंदी चेहरा दाखवतो माञ मनाच्या/मेंदूच्या गाभाऱ्यात तणाव युक्त स्थिती असते,युध्दस्थिती असते,आपण समोरच्याला तर आनंदी असल्याचा भास करून फसवतोच पण स्वतः ला सर्वात ...

मी राजेश्री काळे.....

मी राजेश्री काळे..... मी एक सोलापुर मध्ये राहणारी एक पारधी समाज्यातील बाई पारधी समाज म्हंटले की त्याच्या कडे फक्त गुन्हेगार म्हणुनच पाहिले जाते चोर म्हंटले की आमच्यावर शिक्का  मारलेला असतो ... आमच्या पारधी समाज्यामध्ये लहानपणीच  मुलीचं लग्न केलं जात तसेच माझं ही लग्न लहानपणी  करण्यात आलं तेव्हा मी चवथीला  होती ... लग्न झाल्यावर आम्ही पुण्यात गेलो माझ्या नवऱ्याच्या घरी हातभट्टी दारू काढण्याची  होती मी तीते दारू काढत होती .... अश्यातच एक केस मध्ये माझ्या नवऱ्याला पोलिसांनी घेऊन गेले त्यावेळेस मी  चवधा वर्ष्याची होती आणि त्यात मी पोटुशी  होती मला दिवस गेले होते माझा नवरा सुटून  आल्यावर नवरा मला म्हणाला की तुझ्या पोटातील  मुलं माझे नाहीच ... मग तीते जातपंचायत  बोलवली  आमच्या समाज्यात कोर्ट म्हणजे आमच्यातला मुख्य माणुस असतो आणि न्याय   निवाडा करतो मग त्यांनी माझी सत्वपरीक्षा  घेतली पोटात मुलं असुन मला अग्नीतून  मला चालायला लावले एवढा हा आमचा पारधी समाज अंधश्रद्धेमध्ये  गुंतला आहे ... मग मी तीते रस्त्या...

"मनाचे अॉपरेशन"

अॉनलाईन माईंडफुलनेस कार्यशाळा चालू करत आहोत. या कार्यशाळा मधून मनाची *एकाग्रता,स्मरणशक्ती,सजगता,भावनिक संतुलन, तनाव व्यवस्थापण. चिंता,उच्च रक्तदाब,मधुमेह नॉर्मल ठेवण्यासाठी माईंडफुलनेस उपयुक्त आहे. निद्रानाश,फोबिया,डिप्रेशन,वा मानसिक समस्या निवारण्यास माईंडफुलनेस जीवन अमृत आहे. विद्यार्थ्यांचे ज्ञानसंपादन,आत्मभान,कौशल्य वृध्दी,सहिष्णूता वाढीसाठी माईंडफुलनेस मोलाचे काम करत आहे. हा माईंडफुलनेस प्रॕक्टिकली कोर्स १० आठवड्यांचा राहिल. सरावासाठी अॉडिओ बुक उपलब्ध. या कोर्सची फि- ६०००/-रू राहिल. दिवसातील फक्त दहा मिनिटे कधीही सराव करू शकता. समुहात फक्त कोर्स करणाऱ्या व्यक्ती/विद्यार्थी यांनीच सहभागी व्हावे! नाव नोंदणी चालू. आमच्या माईंडफुलनेस व्हाट्सअॕप समुहात सहभागी होऊन माईंडफुलनेस प्रशिक्षण घ्या. Mr.RAHUL SIDDHARTH DALVI CENTRAL BANK OK INDIA-Kalyan(W) Branch. A/c - 3716137635 IFSC Code- CBINO280639 Googal pay mobile numbar 7066217153           -राहुल दळवी      माईंडफुलनेस प्रशिक्षक web- manacheop...

संमोहन रोमांचक इतिहास-भाग ३

संमोहन रोमांचक इतिहास            भाग-३     संमोहनशास्ञाची पहिली सुरूवात कोणी केली असेल तर डॉ.मेस्मर यांचे नाव घेतले जाते.यांना संमोहनाचे जनक म्हटले तरी वावगे ठरणार नाही.         डॉ फ्रँन्झ मेस्मर जर्मनीतील इझगँग खेड्यातील 'कॉन्स्टन्झ' नावाच्या तळ्याकाठावरील गावात २३ मे १७३४ रोजी त्यांचा जन्म झाला.त्यांनी ज्येझुईट्सकडून तत्त्वज्ञानाचे शिक्षण घेऊन त्याने वकील आणि धर्मगुरू होण्याचे ठरवले पण त्यात ते अयशस्वी झाले.त्यानंतर १७६७ साली व्हिएन्ना विद्यापीठात वैद्यकशास्ञ शिकून पदवी मिळवली.             डॉ.मेस्मर यांनी एक अॉन पी इन्फलूअन्स अॉफ दी प्लॕनेटस हा शोध निबंध मानवाच्या शरीरावरती गुरूत्वाकर्षणाचा काय परिणाम होतो याच्या वरती अधारीत लिहिला होता.त्यात त्यांना पीएचडी मिळाली.एवढेच नाही तर डॉ.मेस्मर यांनी अनेक ग्रहतार्यांच्या गुरुत्वाकर्षणाचा मानवाच्या प्रकृतीवर परिणाम होतच असतो.असंही प्रबंधात म्हटलं होतं त्यांना अस वाटे की गुरुत्वाकर्षणामुळे जस मानवाच्या शरीरावरती परिणाम होतो तसा चुंबकत्वाचाही मानवाच्...

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन.सप्टेंबर १०.

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन               १० सप्टेंबर    जीवन खुप सुंदर आहे,त्याला आनंदाने जगाता यायला हवे! निसर्ग निर्मित प्राण्यांमध्ये सर्वांत बुध्दीमान प्राणी हा मनूष्य आहे.तरीही तोच आत्महत्याला बळी पडतो.याच्या सारखी भयानक परिस्थिती दुसरी नसेल असे वाटते. आपल्या आजूबाजूला अनेक सरपटणारे व सस्तन प्राणी आपण पहात असतो.माञ त्यातील एखाद्या सापाने किंवा कुञ्या-मांजराने आत्महत्या केली,असे कधी ऐकण्यात आले आहे का? नाही ना.कारण त्यांच्या मेंदूच्या वाढीमध्ये pre-frontal cortex भागाची वाढ झालेली नसल्या कारणाने त्यांना विचार करता येत नाही.चांगले वाईट समजत नाही. तोच pre-frontal cortex चा भाग(मोठा मेंदू)मानवाला निसर्गाकडून देणगी स्वरूपात मिळालेला आहे.त्यामुळेच मानूस विचार करतो,चांगले वाईटांची त्याला पारख कळते.तरीही आपण माञ त्याचा वापर करायला कमी पडतो.नको असणाऱ्या विचारांचे ओझे डोक्यावरती(मेंदूत साठवून)ठेवतो.चिंतन करणे,सोडून चिंता करतो.तणावयुक्त जीवन जगत असतो.त्यातूनच मानसिक समस्या उदभवायला लागतात.आणि आत्महत्या/चिड-चिड,रागासारखे विचार/भावना म...

एक अनुभव.

एक अनुभव. “बायपोलर डिसअॉर्डर” काही दिवसांपूर्वी ची गोष्ट.मला एक फोन आला होता.पुढील व्यक्ती दबकत-दबकत बोलत होती.तिला काही तरी माझ्याशी बोलायचे होते,सांगायचे होते.सांगताना घाबरत खुप घाबरून गेली होती.मी तिला विश्वासात घेऊन विचारले तेंव्हा ती बोलायला लागली. माझ्या फेसबुक वरील लेखन वाचून ती स्व:ता तसे सराव करत होती.त्याच्यातून तिला बराच आधार वाटायचा असे ती बोलत होती.गेली सहा वर्षापासून बायपोलर डिसअॉर्डर या समस्ये मध्ये गढून गेली होती.मानसउपचार यांच्याकडे उपचार ही चालू होते.दिवसातून २२ ते २५ गोळ्या घेत होती.सतत निरूत्साह,आळस,आणि त्या गोळ्या यांनी पूर्ण कंटाळलेली होती.पेपर मधील जाहिरात वाचून पूणे या ठिकाणी एक संमोहन तज्ञ यांची ही कार्यशाळा केली.पण म्हणावे तसा समाधान वाटत नव्हते. माझ्या फेसबुक लेखनातून नंबर पाहून त्यांनी मला फोन केला होता.फोन वरती आमचे बरेचसे बोलणे ही झाले.माझ्या “मनाचे अॉपरेशन” माईंडफुलनेस थेरपी विषयी समजून सांगितले.व त्यांनी माईंडफुलनेस थेरपी चालू केली. मी पहिल्यांदा त्यांना मनाची एकाग्रता व पुढील तीन सेशन पर्यत.दोन ते अडिच महिने चालू ठेवले.त्याच श्रेय माञ वेळोवेळी...

Awarded 2019

 🧘‍♂ संवेदना फाउंडेशन व                संवेदना नॕशनल असोसिएशन 🧘‍♂             अंतर्गत घेण्यात आलेल्या                " सैराट लेखन स्पर्धा"   "सैराट लेखन"स्पर्धा २०१९ मधील विजेते *लेखक* ------------------------------------------ 📜 outstanding awarded        Mrs Sunita Ingle,Sirse. 📜 1st awarded to        Mr.Dnyaneswar sabale,aurangabad..... 📜 2nd awarded to        Mrs Lalita Take,Bhusawal. 📜 3rd awarded to        Mr.sidbarao Pole.Hingoli. 🌹💐Wish you and congratulations🌷💐🌹 ----------------------------------------------- *"सैराट लेखन"* स्पर्धा मधील सहभागी लेखकांचे *संवेदनात्मक* आभार!

सजगता एक बॉडिगार्ड

सजगता एक बॉडीगार्ड     सजगता ही आपल्या मनाची,शरीराची रक्षक आहे.जी सतत आपले रक्षण करते. आपल्या डोळ्यामधून आपण अनेक दृश्य पहात आसतो.कानांनी अनेक गोष्टी ऐकत आसतो त्याचा ही आपण वेगवेगळा अर्थ लावतो तर कधी गैरसमज करूण घेतो,नाकाने अनेक सुगंध दुर्गंध घेत आसतो त्यातील काहीना आपण चांगले म्हणतो तर काहींना वाईट म्हणतो.जीभेने अनेक वेगवेगळ्या चव चाकत आसतो त्यातील काही आवडणार्या असतात तर काही नावडणार्य,शरीरावरती अनेक वेदनांचे अनुभव घेत आसतो काही आनंददायक काही दुःख दायक तर काही अदु:ख - असुख,आणि आपण आपल्या  परिणे त्याचा अर्थ लावण्याचे काम करतो.या आर्थातून अनेक समज-गैरसमज निर्माण होतात.या मध्ये ही आपण कळत नकळत सजग आसतो.पण स्व-ला रोखून ठेवण्याची सजगता आपल्या मध्ये फार कमी आसते.या मधूनच अनेक तनावांना आपल्याला सामोरे जावे लागते.त्यातून आपली मानसिकता बदलते.याच्यातूनच रक्तदाब,निद्रानाश,डिप्रेशन, फोबिया,सारखे आजार बळावतात आणि आपण मानसिक व मनोशारीरीक आजारांना बळी पडतो. या सर्व गोष्टी आपण योग्य सजगतेने विचार न करण्यामुळे उद्भवतात.आणि आपण या सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी अनेक ठिकाणी धा...

पॕनिक अटॕक

पॕनिक डिसअॉर्डर   पॕनिक अॕटॕक म्हणजे तिव्र स्वरूपाची भिती वाटणे.ह्दय जोरात धडधडणे,श्वासाची गती कमी जास्त होणे,चक्कर येणे,छातीत कळ येणे,ही पॕनिक अॕटॕक ची लक्षणे आहेत. या मध्ये प्राथमिक स्वरूपाचे तीन घटक पॕनिक अॕटॕक मध्ये वर्णन केले जातात. १) परिस्थितीनुसार येणारा अॕटॕक - उंच जागेची भिती वाटणे,घाटा मधून अथवा पुला वरून गाडी चालवणे,अशा ठिकाणी हा अॕटॕक येतो. २) अनपेक्षित येणारा अॕटॕक - अचानक कधीही कुठेही येणारा पॕनिक अॕटॕक ज्याची आपण कल्पना  सुध्दा करू शकत नाही. ३) अनुकूल परिस्थितीत येणारा अॕटॕक - या मध्ये वरील दोन्हीची परिस्थिती आसणे,एखाद्या वेगळ्या परिस्थिती मध्ये हा पॕनिक अॕटॕक येईल किंवा येणार ही नाही.याचा अंदाज आपल्याला नसतो. यातील अनपेक्षित व अनुकूल परिस्थितीत येणारे अॕटॕक,पॕनिक अॕटॕक मध्ये महत्त्वाचे आहेत. अनुभव व प्रतिक्रिया या दोघांमध्ये मध्यस्थिचे काम करणारा आपली बुध्दीमत्ता आहे.ग्रहण क्षमता,दक्षता,सावधणता,याचा परिणाम व्यक्तीच्या प्रतिक्रियावर होतो. आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या परिस्थितीला कोणत्या प्रतिक्रिया देतो यावरती आवलंबून आसते.या मध्ये चिंता विक...

अॉनलाईन माईंडफुलनेस प्रशिक्षण

आम्ही अॉनलाईन माईंडफुलनेस स्ट्रेस मॕनेजमेंट ट्रेनिंगचे नियोजन केले आहे. 🤷🏻‍♂खुप लोकांना आपल्या  मानसिक तणावातून- समस्या मधून, मुक्त होऊन जीवन जगावसे वाटते. परंतु आपल्या दैनंदिन जीवना मधून वेळ काढून कार्यशाळा मध्ये सहभागी होता येत नाही. वेळ देता येत नाही. तर काहींना समस्या मुक्त होण्यासाठी वेळ आसतो पण त्या ठिकाणी समस्या निवारण केंद्र नसतात, त्यासाठी लांब पर्यत जावे लागते. अशा सर्व व्यक्तींसाठी त्यांची वैयक्तिक समस्या समजून घेऊन माईंडफुलनेस ट्रेनिंग व थेरपी च्या माध्यमातून समस्या निवारण करण्यात येईल. यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. घरी राहून आपल्याला याचे ट्रेनिंग घेता येईल. 🙇‍♀हे ट्रेनिंग व थेरपी कोणासाठी. मानसिक ताण-तनाव,निद्रानाश,रक्तदाब,भीती, टेन्शन,न्युनगंड,एकाग्रता अभाव,स्मरणशक्ती व अनेक अशा मानसिक समस्या, मधून आनंदी जीवन जगण्यासाठी या माईंडफुलनेस ट्रेनिंग व थेरपीचा उपयोग होईल. 👨‍🏫विद्यार्थी,🤱गृहिणी,नोकरदार,🤵डॉक्टर,👨🏻‍💻उद्योजक.व्यक्ती या ट्रेनिंग व थेरपीचा उपभोग घेऊ शकतात. 🧘🏻‍♂ माईंडफुलनेस ट्रेनिंग थेरपी १० आठवड्यांची राहील. व समस्या कोणती आहे त...

सजगतेचे भान

सजगतेचे भान     कित्येक वेळी आपण आपले भान हरपून काही गोष्टी करत आसतो.ती गोष्ट काही वेळाने,काळाने,आपल्या लक्षात येते तेंव्हा वेळ निघून गेलेली आसते.आणि आपण त्या घडून गेलेल्या गोष्टीचा पश्चाताप करत बसतो.स्व:ताला स्व:ताच दोष देत रहातो.कित्येकदा आपण ठरवलेले देखील आसते कि आता असे वागायचे नाही.पुन्हा ती चूक करायची नाही.तरी देखील पुढील वेळेस भान हरपून आपण ती चूक करतो.आणि पुन्हा नंतर पश्चाताप करत आसतो.असे का? बरे घडत असावे.   आपण आपल्या मेंदूला सतत काहीना काही प्रतिक्रिया देत आसतो.त्यातून रागाचा भावना,द्वेषाचा भावना,उत्पन्न होत असतात.आपण जी प्रतिक्रिया देणार त्या वरती ती भावना तशीच निर्माण होते.ही क्रिया एवढी जलद होते कि क्षणार्धात घडून जाते.ते आपल्याला कळत देखील नाही.त्याची प्रतिक्रिया आपल्या शरीराद्वारे,कृतीद्वारे,उमटते.याला जबाबदार आपणच आसतो. लहान-लहान गोष्टीवरून सतत रागाचा भावनिक प्रतिक्रिया देणे.त्या सतत च्या प्रतिक्रिया मुळे मेंदूला त्याची सवय जडते.तशी एखादी घटना घडली कि क्षणार्धात मेंदू कडून प्रतिक्रिया येते आणि आपण तसे वागायला भाग पडतो.कारण आपण स्व:ताच आपल्या मेंद...

नोसिबो व प्लासिबो

नोसिबो(Nocibo)व प्लासिबो(placebo) सजगध्यानाची ओळख       आपण आपल्या आजूबाजूला तर कधी स्वतःहा अनेक चमत्कारिक आजार बरे झालेले पाहिले आसतील किंवा अनुभवले ही आसतील.अनेक व्यक्तींना प्रश्न पडलेले आसतील.माझ्या वरती कोणीतरी करणी केलेली आहे.मुठ मारली आहे.याच्यामुळे मला सतत काहीना-काही ञास होतो,माझे कामावरती लक्ष लागत नाही.साहेब सारखे ओरडतात.आमच्या नवरा-बायकोचे चांगले चाले होते.आता आजिबात पटत नाही.आमचे चांगले चालेले कोणाला बघवत नाही.आमच्या  संसाराला कोणाची तरी दृष्ट लागलेली दिसते.असे अनेक विचार व सौम्य मानसिक विकार(Neurosis)विकृती निर्माण होतात.किंवा एखाद्या वेळी डॉक्टरनी चुकीचा रिपोर्ट/सल्ला दिल्यामुळे आपण आपले शारीरीक व मानसिक रिपोर्ट चांगले असताना ही त्या विचारां प्रमाणे,रिपोर्ट प्रमाणे विचार करायला लागतो.त्या नुसार आपली मानसिक स्थिती बनते.म्हणजे आपल्या चुकीच्या विचारानी शरीरातील रसायने त्यानुसार बदलत रहातात.याला "नोसिबो"(Nocebo) म्हणतात. आपण एखाद्याला औषधी स्वरूपा मध्ये हाजमोलाच्या किंवा इतर गोळ्या देतो. अथवा पातळ औषधी समजून फक्त पाणी देतो.व आपल्या वरती विश्वास ठे...

ध्यान

ध्यान    भारतीय समाजामध्ये ध्यानाला एक वेगळे महत्व आहे.त्याचे अनेक अर्थ ही काढले जातात.काहींचा मते ध्यान ही मोक्ष प्राप्तीसाठी केली जाणारी साधना आहे.तर काहींचा मते अध्यात्मिक साधना आहे.याचे अनेक अर्थ जोडले गेले आहेत.उपासना,धर्म,अध्यात्म,अशी याची ओळख निर्माण झाली आहे.काही भारतीय संतानी याचा आप-आपल्या शब्दात प्रचार आणि प्रसार ही बराच केला आहे.२५०० वर्षा पूर्वी सिद्धार्थ बुद्धांनी आनापानसती ध्यानातून बुद्धत्व प्राप्त केले.अनेक संन्यासी/ग्रह्स्ती व्यक्तींना ध्यान शिकवले ही,त्याचा अनेक साधू-संत,ग्रह्स्तीनी जीवन आनंदी बनवण्यासाठी,दु:ख मुक्तीसाठी उपयोग करून घेतला आहे.याचे आज हि बौध्द भिक्खू उपयोग करताना दिसत आहेत.त्याच बरोबर ओशो यांनीही ध्यानाचा बराच प्रसार केला आहे.आज ही त्यांचा आश्रमात ध्यान शिबिरे घेतली जातात.तसेच आज संपूर्ण भारत व पाश्चिमात्य देशात,सत्यनारायण गोयंका गुरुजींनी ध्यानसाधनेचा प्रसार केला आहे.ज्याला आपण विपश्ना नावानी ओळखतो,ही ध्यानसाधना बुद्धांच्याकडूनच मिळाली आहे.जी भारतामधून लुप्त झाली होती.तीला पुन्हा भारतभूमीत रुजवण्याचे काम गोयंका गुरुजींनी केले.ते कार्य त्...

फाईट ऑर फ्लाईट रिप्लेक्स

फाईट ऑर फ्लाईट रिप्लेक्स         आज आपण एक महत्वाचा विषय पाहणार आहोत.आपल्याला युध्द हा शब्द परिचित आहेच,यालाच आपण आणीबाणीची स्थिती तर आजकाल सर्जिकल स्ट्राईक असे ही आपण बोलत असतो.हे शब्द आपल्या कानावरती पडले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर रणगाडे,बंदूक,सैनिकांची तुकडी  डोळ्यासमोर उभी रहाते. पण या गोष्टी एवढ्या वरती थांबत नाहीत आपले रक्त सळसळ करत असते,छाती भरून येते,अंगावरती काटा उभा रहातो ही एक युध्द स्थितीच असते आपल्या शरीरात निर्माण झालेली.या स्थिती मुळे आपल्यात जोश निर्माण झालेला आसतो. हे कशामुळे होते याचा आपण कधीच विचार करत नाही.तो विचार आजचा या धावपळीचा युगात करणे खूप गरजेचे आहे.        ही एक बाजू झाली याचीच दुसरी बाजू आपण पाहू.आपण एखादी चूक केली असेल व ती घरी कळली तर आपल्याला ओरडा बसेल ही कल्पना करण्यांनी सुधा आपल्या अंगावरती काटा येतो,घाम फुटतो,छाती धडधडते,रक्तदाब वाढतो,अशा अनेक कल्पना आपण सतत करत असतो.आणि शरीर मेंदू मध्ये आपण युध्दस्थिती निर्माण करून घेत रहातो.      वही युद्धस्थिती आपल्या कल्पनेमुळे निर्माण होते.हा 'फाई...

सजगता काळाची गरज

सजगता काळाची गरज               आज आपल्याला खऱ्या अर्थाने जीवन जगण्यासाठी या नवयुगामध्ये सजगतेची खूप गरज आहे.आपल्या धकाधाकीचा जीवना मध्ये आपण एवढे व्यस्थ झालो आहोत कि आपण  आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे हि विसरून गेलो आहोत.मग ते विद्यार्थी असो कि गृहिणी असो ,उद्योजक असो कि नोकरदार,आपण सगळेच आपल्या करियर,प्रसिध्दी,पैसा,यांचा मागे लागून आपण आपल्या  मानसिक व मनोशारीरिक आजारास निमंत्रण देत आहोत.यामुळेच आपण आज रक्तदाब,शुगर,थायरॉइड,निद्रानाश,डिप्रेशन,व अनेक मानसिक मनोशारीरिक आजारांना बळी पडत आहोत .          आज प्रत्येकाला आपले करियर, पैसा,प्रसिध्दी,हवी आहे.आणि ती मिळवणे हि गरजेचे आहे.ते मिळवत असताना आपण मानसिक व शारीरिक दृष्ट्या मजबूत असणे फार गरजेचे आहे. आपण मानसिक व शारीरिक दृष्ट्या मजबूत नाही राहिलो तर,कदापी आपल्याला आपल्या करियरचा,पैशाचा,प्रसिध्दीचा आनंद घेता येणार नाही.किंवा कदाचित आपण मानसिक व मनोरुग्ण होऊन जाऊ अथवा त्या मिळवलेल्या आनंदाचा सुखाचा उपभोग न घेताच एक मशीन म्हणून राहू.या पासून आपल्याला सावध रहायचे असेल त...

व्हिज्युअलायझेशन

#कल्पना_ध्यान(व्हिज्युअलायझेशन ) व्हिज्युअलायझेशन  म्हटले की अनेकांच्या मनात एक जादू आसल्यासारखे वाटते.फक्त कल्पना करूण आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी आपले स्वप्न आपण पूर्ण करू अशा भ्रामक समजूती आपल्या समाजामध्ये दृढ झालेल्या आढळून येऊ लागल्या आहेत. एक विचार करा.फक्त कल्पना करण्यांनी आपल्याला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी मिळवता येतात का?कि त्याला ही प्रयत्नांची जोड द्यावी लागते.जेंव्हा याचे चिंतन कराल तेंव्हा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे सापडल्या शिवाय रहाणार नाहीत. आज अनेक मंडळी,#माईंडफुलनेस कार्यशाळा संदर्भात विचारत असताना.मला #व्हीज्युअलायझेशन हे कितपत उपयोगी आहे का? ते करायला हवे का? आम्ही #द_सिक्रेट हे पुस्तक वाचले,अनेक वेळा या विषयी ऐकले ही आहे.अनेक व्यक्ती यशस्वी झालेत ते कसे काय? #आपण_ते_पाहू_या! आपण दहावी/बारावी ला आहोत.आपल्याला येणाऱ्या बोर्ड परिक्षा मध्ये पास होण्याचे आहे. आणि आपण फक्त अभ्यास करण्याची कल्पना करत बसलो.व प्रत्यक्षात अभ्यास केलाच नाही तर बोर्ड परिक्षा पास होईल की नापास.आपण नक्कीच परिक्षेमध्ये शेवट हून पहिला नंबर काढलेला आसेल.व माञ आपण प्र...

संमोहन व रिलॕक्सेशन

*संमोहन व रिलॕक्सेशन* संमोहन सुचना या १००% टक्के मानसिक आजारावरती उपयुक्त आहेत.पण याचा लाभ काही मानसिक समस्या व्यक्तींना,काही काळापूर्ता मिळतो तो तर काही व्यक्तींना पूर्ण काळ याचा लाभ मिळालेला आढळून येत आहे. *संमोहन सुचना* आपण घेतो म्हणजे नक्की काय करतो.तर आपण आपल्या मेंदूला प्रतिक्रिया देत रहातो.या प्रतिक्रिया वारंवार आपण मेंदूला देत रहातो.त्या प्रतिक्रियांचा प्रतिसाद म्हणून मेंदू काम करतो. या प्रतिक्रियांचा परिणाम वैचारिक मेंदू वरती होत असावा.पण जेंव्हा या सुचना देणे कमी होत जातील. तेंव्हा पुन्हा-पुन्हा मेंदूत तणाव,डिप्रेशन,भिती चे विचार सतत येत रहातात,या सतत च्या विचारांचा परिणाम अमायग्डाला वरती होऊन युध्द स्थिती निर्माण होते व व्यक्ती मानसिक स्थैर्य गमावू लागतो  मानसिक व मनोरूग्न बनून जातो. या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला रिलॕक्सेशन रिस्पॉन्सची आवश्यकता आहे. या रिलॕक्सेशन रिस्पॉन्सचे खरे वैज्ञानिक महत्त्व डॉ.हर्बर्ट बेन्सन यांनी करून दिले.१९७५ साली त्यांचे रिलॕक्सेशन रिस्पॉन्स हे पुस्तक हे प्रसिध्द झाले या पुस्तकाने अमेरिका मध्ये खळबळ उडाली व त्यांच्या...

*मानसिक तणाव,चिंता,रक्तदाबास,अनापानसती ध्यानाची  गरज*.

*मानसिक तणाव,चिंता,रक्तदाबास, अनापानसती ध्यानाची  गरज*.     आज आपल्याला शांततेची गरज असूनही आपण शांत रहाण्याचा प्रयत्न करत नाही.कारण आपल्या व्यस्त जीवनातून बाहेर डोकावून पहाण्यास वेळ मिळेनासा झाला आहे.याचातुनच मानसिक तणाव,चिंता,रक्तदाब,सारखे अनेक भस्मासुर आपले जीवन भस्म करण्यास पहात आहेत.या भास्मासुरांवर विजय मिळवायचा असेल तर शांततास्तिथी गरजेची आहे.आज प्रत्येकाला रक्तदाब,सारख्या विकृतीने ग्रासून टाकले आहे.जिकडे जाईल जाईल तिकडे रक्तदाब असणार्या सरास व्येक्ती पहायला मिळतायत.याचे मुळ म्हणजे मानसिक तणाव,चिंता,        रक्तदाब,असणार्या प्रत्येक व्येक्तीला महिना,पंधरा,दिवसांनी हॉस्पिटलची चक्कार मारावी लागते.सतत गोळ्यांचा बदल करावा लागतो.याला तर व्यक्ती वैतागल्या आहेत.कालच मला एक ओळखीचे ग्रस्त हॉस्पीटल मध्ये भेटले,मी सहज त्यांना विचरले आज इकडे कसे काय,कोणी आजारी आहे का?.मी विचारताच त्यांनी बोलायला सुरवात केली,गेली ३० वर्षापासून महिना,दिडमहिण्यातून डॉ.देशपांडे यांचाकडे रक्तदाब साठी गोळ्या चालू आहेत.सकाळ,संध्याकाळ न चुकता गोळ्या घ्याव्या लागतात.कंट...

सजगता व्यसनमुक्ती उपयुक्त

*सजगता ध्यान* *व्यसनमुक्तीचे* *औषध*   आपण आपल्या आजूबाजूला बरेच दारू पिणारे,सिगारेट फुंकणारे,गांजा,चरस,अशा अनेक व्यसनांनी आहारी गेलेल्या मंडळी पहात असाल. यातील बहुतेक मंडळी कोणत्या ना कोणत्या तणावामुळे दारू पित असतात.अशा बर्याच मंडळीना विचारले असता टेन्शन असते हो ते घालवण्यासाठी दारू पितो.मला काय हाऊस आहे का? दारू पिण्याची अशी उत्तरे येत असतात.     नक्की टेन्शन येते म्हणजे काय होते.आपल्या दिवस भरातील कामाचा ताण तर काही संसारीक तणाव व त्या गोष्टींचा सतत विचार करण्याने आपल्या मेंदू मध्ये युध्दस्थिती निर्माण होते.आपल्या काय करू काय नको असे होते.त्यातून चूकीचे वर्तन घडते.सतत चिड-चिड होते,राग अनावर होतो.काही सुचत नाही समजत नाही.म्हणजेच टेन्शन होय.या मेंदूच्या/मनाच्या युद्धस्थितून शांत होण्यासाठी आपण व्यसनांचा आधार घेतो. या व्यसनांच्या आधाराने काही काळ मेंदू/मन शांत स्थितीत रहाते.काही काळाने पुन्हा आपल्या मेंदूची/मनाची युध्दस्थिती निर्माण होते.ती पुन्हा घालवण्यासाठी आपण व्यसनाचा आधार घेत रहातो.व आपल्या मेंदूला/मनाला त्याची सवय लावून ठेवतो.ती एवढी सवय लागते की तिच्या विना ...

कार्यशाळा

अॉनलाईन माईंडफुलनेस कार्यशाळा चालू करत आहोत. या कार्यशाळा मधून मनाची *एकाग्रता,स्मरणशक्ती,सजगता,भावनिक संतुलन, तनाव व्यवस्थापण. चिंता,उच्च रक्तदाब,मधुमेह नॉर्मल ठेवण्यासाठी माईंडफुलनेस उपयुक्त आहे. निद्रानाश,फोबिया,डिप्रेशन,वा मानसिक समस्या निवारण्यास माईंडफुलनेस जीवन अमृत आहे. विद्यार्थ्यांचे ज्ञानसंपादन,आत्मभान,कौशल्य वृध्दी,सहिष्णूता वाढीसाठी माईंडफुलनेस मोलाचे काम करत आहे. हा माईंडफुलनेस प्रॕक्टिकली कोर्स १० आठवड्यांचा राहिल. सरावासाठी अॉडिओ बुक उपलब्ध. या कोर्सची फि- ६०००/-रू राहिल. दिवसातील फक्त दहा मिनिटे कधीही सराव करू शकता. समुहात फक्त कोर्स करणाऱ्या व्यक्ती/विद्यार्थी यांनीच सहभागी व्हावे! नाव नोंदणी चालू. आमच्या माईंडफुलनेस व्हाट्सअॕप समुहात सहभागी होऊन माईंडफुलनेस प्रशिक्षण घ्या. Mr.RAHUL SIDDHARTH DALVI CENTRAL BANK OK INDIA-Kalyan(W) Branch. A/c - 3716137635 IFSC Code- CBINO280639 Googal pay mobile numbar 7066217153           -राहुल दळवी      माईंडफुलनेस प्रशिक्षक web- rahuldalvi.mbiz.in     ...