रंग उधळू सजगतेचे 🕺🏻 सवंगड्या सोबत रंगात रंगाने रंगने या सारखा आनंद कुठे नाही. आपण ही असेच आपल्या मनाच्या अवस्थेत सतत रंगून जात असतो.एवढे रंगतो की आपण आपले भान विसरून जातो.याची उधळन माञ आपला मेंदू सतत करतो.त्या उधळनीची सुरूवात चिंता,तणाव,निद्रानाश,उच्च रक्तदाब, पासून ते मानसिक संतुलन बिघडण्या पर्यंत होत असते.या मेंदूच्या रंग उधळनीला माञ थांबवने सहजा-सहजी शक्य होत नाही. हि रंग उधळण स्पर्श,संवेदना,इच्छा,लोभ,मोह,पासून सुरूवात होते.आणि त्याचा शेवट कधीही सदृढ मानसिक स्वास्थ्याने होत नाही.त्याचा शेवट मानसिक दुःख,वेदना यांनीच होतो. या मनाच्या अवस्थेचा मेंदूतील रंग उधळनीचा शेवट आनंदाने करण्यासाठी आपल्याला सजगता(माइंडफुलनेस) चे रंग उधळावे लागतील,एकदा या सजगतेच्या रंग उधळण्याची सवय झाली की कोणताही कसलाही रंग मेंदूत उधळूदे त्याला घालवण्याचे काम माञ सजगतेच्या रंगात आहे. नाही तर आपण अनेक वेगवेगळे रंग लावतो.व ते ध...