Skip to main content

Posts

Showing posts from August, 2024

"मनाचे ऑपरेशन"

भाग-१ *"मनाचे ऑपरेशन"* म्हणजे काय? थोडक्यात सांगायचे झाले तर,सजग जीवन म्हणजेच "मनाचे ऑपरेशन" होय. एका वाक्यात किती सोपे आणि सहज असे वाटून गेले.सावधान हे फक्त एका वाक्यात सहज आहे.प्रत्यक्षात मात्र खूप किचकट आणि अवघड आहे. *मन मनाच्या अवस्था,स्पर्श,मनात निर्माण होणाऱ्या भावना/विचार/यांचा शरिरावर्ती होणाऱ्या संवेदना त्यातून निर्माण होणाऱ्या प्रतिक्रिया सुख, दुःखाची कारणे.मानसिक,मनोशारिरीक आजार,आणि सतत चालणारा जीवन प्रवास* यांना आपल्याला योग्य ते वळण संस्कार देता येण्यासाठी आपल्याला आपल्या "मनाचे ऑपरेशन" करता यायला हवे! ते फक्त एका वाक्यात संपणारे नव्हे,म्हणूनच ते जेवढे सहज सोपे वाटते.तेवढेच अवघड आणि किचकट आहे. स्पर्श पासून ते विज्ञान पर्यंत त्याची चिरफाड करणे म्हणजेच "मनाचे ऑपरेशन" कदापि हा विषय समजण्यास कठीण जेवढा आहे तेवढाच सहज आणि सोपा आहे.त्यामुळे आपल्या मनात येणारे प्रश्न विचारत रहाल तेवढा हा विषय सहज होत जाईल. *पुढील भागात आपण सूरवात करणार आहोत."मनाचे ऑपरेशन" करण्याची तयारी* ✒️ राहुल सि, दळवी   माईंडफुलनेस : प्रशिक्षक

"मनाचे ऑपरेशन"

*वाचाल तर वाचाल* भाग - २ "मनाचे ऑपरेशन"  या मध्ये आपण पाच मनोवस्था पाहणार आहोत *१)स्पर्श २) मनस्कार(मनाने विषय पकडुन ठेवणे) ३)वेदना ४)सज्ञा (विषयाचे गुणधर्म ओळखणे) आणि पाचवी आहे 5) चेतना* यातील पहिली अवस्था आहे. *स्पर्श* ही प्रथम अवस्था आहे.ही अवस्था निर्माण होण्यासाठी एकादा विषय आणि चित्त(मन) असायला हवे.तरच ही अवस्था निर्माण होते ती कशी ते पाहुयात.आपले शरीर हे पंच-इंद्रियापासून बनलेले आहे.या पंच-इंद्रियमध्ये मनाचे स्थान आहे.या मनाला स्पर्श होण्यासाठी विषयाची आवश्यकता असते ती या पंच-इंद्रियपासून निर्माण होते. उदा :- आपण टीव्ही पहात असतो,ती टिव्ही हा झाला विषय,आणि डोळे हे माध्यम त्यामध्ये असते ते चित्त( मन) म्हणजेच डोळ्यांना चित्तद्वारे टि.व्ही चा स्पर्श होतो.ही आहे आपल्या जीवनाची पहिली सुरुवात. यासाठी आपले पंच-इंद्रिय मध्ये चित्त(मन) असणे आवश्यक आहे. समजा जर आपला अपघात झाला असेल आणि आपण कोमा मध्ये असू तर आपले डोळे उघडे असताना ही आपल्याला विषयाचा स्पर्श होत नाही.कारण आपले चित्त(मन) तिथे अस्तित्वात नसते.म्हणूनच आपण जिवंत असणे गरजेचे तरच आपण मनाच्या अवस्था अनुभवू शकतो. आणि मन हे...