सजगता ध्यान व्यसनमुक्तीचे औषध आपण आपल्या आजूबाजूला बरेच दारू पिणारे,सिगारेट फुंकणारे,गांजा,चरस,अशा अनेक व्यसनांनी आहारी गेलेल्या मंडळी पहात असाल. यातील बहुतेक मंडळी कोणत्या ना कोणत्या तणावामुळे दारू पित असतात.अशा बर्याच मंडळीना विचारले असता टेन्शन असते हो ते घालवण्यासाठी दारू पितो.मला काय हाऊस आहे का? दारू पिण्याची अशी उत्तरे येत असतात. नक्की टेन्शन येते म्हणजे काय होते.आपल्या दिवस भरातील कामाचा ताण तर काही संसारीक तणाव व त्या गोष्टींचा सतत विचार करण्याने आपल्या मेंदू मध्ये युध्दस्थिती निर्माण होते.आपल्या काय करू काय नको असे होते.त्यातून चूकीचे वर्तन घडते.सतत चिड-चिड होते,राग अनावर होतो.काही सुचत नाही समजत नाही.म्हणजेच टेन्शन होय.या मेंदूच्या/मनाच्या युद्धस्थितून शांत होण्यासाठी आपण व्यसनांचा आधार घेतो. या व्यसनांच्या आधाराने काही काळ मेंदू/मन शांत स्थितीत रहाते.काही काळाने पुन्हा आपल्या मेंदूची/मनाची युध्दस्थिती निर्माण होते.ती पुन्हा घालवण्यासाठी आपण व्यसनाचा आधार घेत रहातो.व आपल्या मेंदूला/मनाला त्याची सवय लावून ठेवतो.ती एवढी सवय लागते की तिच्या विना रहाणे ...