Skip to main content

Posts

 भाग१ माईंडफुलनेस आणि व्यसन *"डिफॉल्ट मोड नेटवर्क" परिणाम व उपयोग*  *डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हणजे काय?* आपण जेंव्हा कोणत्याही प्रकारचे शारीरिक काम करत नसताना शांत बसलो असताना,आपण भूत,भविष्य, काळातील गोष्टींच्या विचार,कल्पना मध्ये सक्रीय होणे म्हणजे (DMN) डिफॉल्ट मोड नेटवर्क होय. याचा परिणाम जेवढा चांगला,तेव्हढाच दुष्परिणाम   *चांगला परिणाम.* आत्मचिंतन करणे, भविष्यातील योजना आखणे, सामाजिक व समाजातील कुटुंबातील नातेवाईक आप्तेष्ट यांच्या बद्दल चांगला विचार करणे,यासाठी महत्वाचा आहे. परंतु जास्त प्रमाणात सक्रिय DMN जास्त प्रमाणात विचार,चिंता, डिप्रेशन  सारख्या मानसिक आरोग्य वाढीसाठी घातक आहे.याचा (ADHD)"अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी" म्हणजे अवधान अस्थिरता आणि अतिक्रियाशीलता विकृती, तसेच Alzheimer's विकार म्हणजे स्मरणशक्ती कमी होणे,विचार आणि निर्णय क्षमता कमी होणे,वर्तनामध्ये बदल,सामाजिक कौशल्ये कमी होणे, अशा विकारांशी संबंध येऊ शकतो. अती व्यसनाधीन मित्रांमध्ये याचा खूप धोका जाणवतो,व्यसनी मित्रांमध्ये जास्त विचार करण्याची प्रवृत्ती(चिंता) एकांत राहणे, स्वतःमध्ये केंद्...
Recent posts

"मनाचे ऑपरेशन"

भाग-१ *"मनाचे ऑपरेशन"* म्हणजे काय? थोडक्यात सांगायचे झाले तर,सजग जीवन म्हणजेच "मनाचे ऑपरेशन" होय. एका वाक्यात किती सोपे आणि सहज असे वाटून गेले.सावधान हे फक्त एका वाक्यात सहज आहे.प्रत्यक्षात मात्र खूप किचकट आणि अवघड आहे. *मन मनाच्या अवस्था,स्पर्श,मनात निर्माण होणाऱ्या भावना/विचार/यांचा शरिरावर्ती होणाऱ्या संवेदना त्यातून निर्माण होणाऱ्या प्रतिक्रिया सुख, दुःखाची कारणे.मानसिक,मनोशारिरीक आजार,आणि सतत चालणारा जीवन प्रवास* यांना आपल्याला योग्य ते वळण संस्कार देता येण्यासाठी आपल्याला आपल्या "मनाचे ऑपरेशन" करता यायला हवे! ते फक्त एका वाक्यात संपणारे नव्हे,म्हणूनच ते जेवढे सहज सोपे वाटते.तेवढेच अवघड आणि किचकट आहे. स्पर्श पासून ते विज्ञान पर्यंत त्याची चिरफाड करणे म्हणजेच "मनाचे ऑपरेशन" कदापि हा विषय समजण्यास कठीण जेवढा आहे तेवढाच सहज आणि सोपा आहे.त्यामुळे आपल्या मनात येणारे प्रश्न विचारत रहाल तेवढा हा विषय सहज होत जाईल. *पुढील भागात आपण सूरवात करणार आहोत."मनाचे ऑपरेशन" करण्याची तयारी* ✒️ राहुल सि, दळवी   माईंडफुलनेस : प्रशिक्षक

"मनाचे ऑपरेशन"

*वाचाल तर वाचाल* भाग - २ "मनाचे ऑपरेशन"  या मध्ये आपण पाच मनोवस्था पाहणार आहोत *१)स्पर्श २) मनस्कार(मनाने विषय पकडुन ठेवणे) ३)वेदना ४)सज्ञा (विषयाचे गुणधर्म ओळखणे) आणि पाचवी आहे 5) चेतना* यातील पहिली अवस्था आहे. *स्पर्श* ही प्रथम अवस्था आहे.ही अवस्था निर्माण होण्यासाठी एकादा विषय आणि चित्त(मन) असायला हवे.तरच ही अवस्था निर्माण होते ती कशी ते पाहुयात.आपले शरीर हे पंच-इंद्रियापासून बनलेले आहे.या पंच-इंद्रियमध्ये मनाचे स्थान आहे.या मनाला स्पर्श होण्यासाठी विषयाची आवश्यकता असते ती या पंच-इंद्रियपासून निर्माण होते. उदा :- आपण टीव्ही पहात असतो,ती टिव्ही हा झाला विषय,आणि डोळे हे माध्यम त्यामध्ये असते ते चित्त( मन) म्हणजेच डोळ्यांना चित्तद्वारे टि.व्ही चा स्पर्श होतो.ही आहे आपल्या जीवनाची पहिली सुरुवात. यासाठी आपले पंच-इंद्रिय मध्ये चित्त(मन) असणे आवश्यक आहे. समजा जर आपला अपघात झाला असेल आणि आपण कोमा मध्ये असू तर आपले डोळे उघडे असताना ही आपल्याला विषयाचा स्पर्श होत नाही.कारण आपले चित्त(मन) तिथे अस्तित्वात नसते.म्हणूनच आपण जिवंत असणे गरजेचे तरच आपण मनाच्या अवस्था अनुभवू शकतो. आणि मन हे...

आत्मभान

 *🧘🏻‍♂️आत्मभान🧘🏻‍♂️* वाढीस माइंडफुलनेस(MBT)मोलाचे. आपण काय करतो,आपल्याला काय हवे,नक्की मी कोण याची आपल्याला स्पष्टता नसते.या मुळे आपण स्व:बद्दल सजग नसतो.आपण भरकटून जातो.आपल्या स्व:ताचे स्वतः हा बद्दलचे मत रहात नाही.इतर व्यक्तींनी आपल्या बाबत केलेले मत म्हणजे आपले मत वाटते. इतरांनी आपल्या विषयी मांडलेल्या मतांच्या प्रवाहा मध्येच आपण वाहत रहातो.आणि आपल्या व्यक्तीमत्वाचा एक भाग बनून जाते.याचा परिणाम आपले वागणे बोलण्यावरती होत आसतो.आपल्याला आपले विचार भावना आपले अस्तित्व वेगळे आहे याची सजगता जाणिव रहात नाही.ही सजगता निर्माण व्हायला हवी.सजगता निर्माण नाही झाली तर आपल्याला नकोसे वाटणारे विचार,ञासदायक विचार भावना यांची घुसमट होते.माञ आपण ते बदलण्यासाठी प्रयत्न करत नाही.इतरांनी लावलेल्या मतांनुसारच आपण जगत रहातो.आपण एखादा निर्णय घेतला की त्याच्या परिणामांशी लढण्यासाठी मानसिक धैर्य कमी पडते.यातून तणाव निर्माण होतो.आपण स्व:ताला हरवून बसतो.आपला आत्मविश्वास इतरांनी केलेल्या कौतुकामध्येच आडकून रहातो.आपण दूसर्यांच्या विचारांनी जगायला लागतो.कोणी काही बोलले तरी आपण लगेच आपली किंमत ठरवू लागतो.क...

तणाव -औदासीन्य वरती माइंडफुलनेस औषध

 तणाव - डिप्रेशन - औदासीन्य वरती *माइंडफुलनेस(MBT) सजगध्यान उपचार पध्दत.* माइंडफुलनेस म्हणजे सजगताध्यान याचे संपूर्ण जगभर संशोधन चालू आहे.तर मेंदू तज्ज्ञ ही याचा वरती संशोधन करत आहेत. आज जर पहायला गेले तर आपण वर्तमान स्थिती मध्ये कमी आणि भूत-भविष्यकाळ मध्ये जास्त रममान होत चाललो आहोत.या मुळे आपण स्वतः हा तणाव स्थिती निर्माण करून घेत आहोत. भूतकाळ मध्ये घडलेल्या काही प्रसंग(घटना)चा विचार आपण सतत करत आसतो.ती गोष्ट घडून गेलेली आहे.हे आपल्याला समजून ही नसमजल्या करतो व त्या गोष्टींचा अतिविचार सतत आपल्या मनामध्ये चालू असतो.या मुळे आपण औदासीन्य(डिप्रेशन)मध्ये असतो.याचा अतिरेक झाला की आपण मानसिकविकृतीने ग्रासले जातो.तर काही लोक भविष्या मध्ये काय होईल.या विचारामध्ये अडकून पडलेले दिसतात.या मुळे चिंताविकृती निर्माण होते. आपण आजचा आनंद सोडून देतो. उद्याच्या आनंदाकडे पहात असतो. आजचाच काळ पाहिला तर कोरोना चा काळ चालू आहे.या काळामध्ये कित्येक अनुभव आपल्याला आलेले आसतील किंवा येताना दिसत आसतील. ज्यांना कोरोना झाला नाही ते या आजाराच्या भितीने चिंता तर करत आहेत.किंवा आपल्या कुटुंबातील अथवा मिञ परिवार...

सजगध्यान व्यसनमुक्तीचे औषध

 सजगता ध्यान व्यसनमुक्तीचे औषध   आपण आपल्या आजूबाजूला बरेच दारू पिणारे,सिगारेट फुंकणारे,गांजा,चरस,अशा अनेक व्यसनांनी आहारी गेलेल्या मंडळी पहात असाल. यातील बहुतेक मंडळी कोणत्या ना कोणत्या तणावामुळे दारू पित असतात.अशा बर्याच मंडळीना विचारले असता टेन्शन असते हो ते घालवण्यासाठी दारू पितो.मला काय हाऊस आहे का? दारू पिण्याची अशी उत्तरे येत असतात.     नक्की टेन्शन येते म्हणजे काय होते.आपल्या दिवस भरातील कामाचा ताण तर काही संसारीक तणाव व त्या गोष्टींचा सतत विचार करण्याने आपल्या मेंदू मध्ये युध्दस्थिती निर्माण होते.आपल्या काय करू काय नको असे होते.त्यातून चूकीचे वर्तन घडते.सतत चिड-चिड होते,राग अनावर होतो.काही सुचत नाही समजत नाही.म्हणजेच टेन्शन होय.या मेंदूच्या/मनाच्या युद्धस्थितून शांत होण्यासाठी आपण व्यसनांचा आधार घेतो. या व्यसनांच्या आधाराने काही काळ मेंदू/मन शांत स्थितीत रहाते.काही काळाने पुन्हा आपल्या मेंदूची/मनाची युध्दस्थिती निर्माण होते.ती पुन्हा घालवण्यासाठी आपण व्यसनाचा आधार घेत रहातो.व आपल्या मेंदूला/मनाला त्याची सवय लावून ठेवतो.ती एवढी सवय लागते की तिच्या विना रहाणे ...
                                            रंग उधळू   सजगतेचे 🕺🏻 सवंगड्या सोबत रंगात रंगाने रंगने या सारखा आनंद  कुठे नाही. आपण ही असेच आपल्या मनाच्या अवस्थेत सतत रंगून जात असतो.एवढे रंगतो की आपण आपले भान विसरून जातो.याची उधळन माञ आपला मेंदू सतत करतो.त्या उधळनीची सुरूवात चिंता,तणाव,निद्रानाश,उच्च रक्तदाब, पासून ते मानसिक संतुलन बिघडण्या पर्यंत होत असते.या मेंदूच्या रंग उधळनीला माञ थांबवने सहजा-सहजी शक्य होत नाही. हि रंग उधळण स्पर्श,संवेदना,इच्छा,लोभ,मोह,पासून सुरूवात होते.आणि त्याचा शेवट कधीही सदृढ मानसिक स्वास्थ्याने होत नाही.त्याचा शेवट मानसिक दुःख,वेदना यांनीच होतो. या मनाच्या अवस्थेचा मेंदूतील रंग उधळनीचा शेवट आनंदाने करण्यासाठी आपल्याला सजगता(माइंडफुलनेस) चे रंग उधळावे लागतील,एकदा या सजगतेच्या रंग उधळण्याची सवय झाली की कोणताही कसलाही रंग मेंदूत उधळूदे त्याला घालवण्याचे काम माञ सजगतेच्या रंगात आहे. नाही तर आपण अनेक वेगवेगळे रंग लावतो.व ते ध...