सजगता ध्यान व्यसनमुक्तीचे औषध आपण आपल्या आजूबाजूला बरेच दारू पिणारे,सिगारेट फुंकणारे,गांजा,चरस,अशा अनेक व्यसनांनी आहारी गेलेल्या मंडळी पहात असाल.
यातील बहुतेक मंडळी कोणत्या ना कोणत्या तणावामुळे दारू पित असतात.अशा बर्याच मंडळीना विचारले असता टेन्शन असते हो ते घालवण्यासाठी दारू पितो.मला काय हाऊस आहे का? दारू पिण्याची अशी उत्तरे येत असतात.
नक्की टेन्शन येते म्हणजे काय होते.आपल्या दिवस भरातील कामाचा ताण तर काही संसारीक
तणाव व त्या गोष्टींचा सतत विचार करण्याने आपल्या मेंदू मध्ये युध्दस्थिती निर्माण होते.आपल्या काय करू काय नको असे होते.त्यातून चूकीचे वर्तन घडते.सतत चिड-चिड होते,राग अनावर होतो.काही सुचत नाही समजत नाही.म्हणजेच टेन्शन होय.या मेंदूच्या/मनाच्या युद्धस्थितून शांत होण्यासाठी आपण व्यसनांचा आधार घेतो.
या व्यसनांच्या आधाराने काही काळ मेंदू/मन शांत स्थितीत रहाते.काही काळाने पुन्हा आपल्या मेंदूची/मनाची युध्दस्थिती निर्माण होते.ती पुन्हा घालवण्यासाठी आपण व्यसनाचा आधार घेत रहातो.व आपल्या मेंदूला/मनाला त्याची सवय लावून ठेवतो.ती एवढी सवय लागते की तिच्या विना रहाणे अवघड होऊन जाते.यालाच व्यसन असे म्हटले जाते.
तर काही व्यक्ती कोणताही तणाव नसताना मिञांच्या सोबतीने व्यसनाधीनतेस बळी पडतात.तर काही मंडळी आज एक फॕशन म्हणून व्यसन करता करता व्यसनाधीनतेला बळी पडता.
यातून माञ ना तणाव रहित होतात ना मानसिक संतुलन ठेवतात.यातून शारीरीक विकृती चालू होते.पोटाचे आजार चालू होतात.सिगरेट व तंबाखू मुळे कर्करोग,ह्रद्यरोगास आपण निमंत्रण देतो.तर रक्तवाहिण्या ताठर झाल्याने रक्तदाब वाढतो.
अशा अनेक आजारांना आपण स्वता:हुन निमंत्रण देत आसतो.आपल्या त्या व्यसनाची तलफ झाली की आपण काहीही करूण ते घेतल्या विना रहात नाही.यातून समाजातील ही आपली प्रतिष्ठा धुळीस मिळते.कौटुंबिक कलह वाढतात.आणि आपण एकटेच बाजूला फेकले जातो.यातून ही मानसिकता बिघडते व आपण मनोरूग्ण होऊन जातो.
यातून सावध रहायचे असेल,मेंदूची/मनाची युद्धस्थिती शांत करूण आपले जीवन आनंदी बनवण्यासाठी माईंडफुलनेस/सजगता ध्यान,आपल्याला आपल्याला विचारांच्या/भावनांच्या युद्धस्थितीतून बाहेर काढणारा एक माञ मार्ग आहे, दारूच्या सिगारेटच्या एका झुरक्याने जी शांत स्थिती अनुभवायची आसते ती आपण काही मिनिटाच्या सजग ध्यानाने स्थिती अनुभवता येते.आपण आपले डोळे झाकून शांत बसायचे येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाचा स्पर्श जाणायचा याने मनातील विचार काही वेळेसाठी कमी होतात.मेंदू/मनाची युध्दस्थिती निवाळते/शांत होते.याच्या सरावाने आपला मेंदू/मन सजग रहाते व काही कालावधीत आपण व्यसनातून मुक्त होतो.
आपण ही आमच्या "मनाचे आॕपरेशन" आर्थात माईंडफुलनेस/सजगता मध्ये सहभागी होऊन जीवन आनंदी बनवा.
राहुल सिध्दार्थ दळवी
माईंडफुलनेस प्रशिक्षक
07066217153

Comments
Post a Comment