Skip to main content

Posts

Showing posts from October, 2019

World mental health day

आज १० अॉक्टोबर... जागतिक मानसिक आरोग्य दिन. " सजगता जीवनाची गुरुकिल्ली" "  आज १० अॉक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिन,१९९२ सालापासून वर्ल्ड हेल्थ अॉर्गनायझेशन(Who)ने मानसिक आरोग्य जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रथम सुरूवात केली.तर जगभरात मानसिक आरोग्य सुधारण्यास व आत्महत्या रोखण्यास बरेच प्रयत्न चालू आहेत.दरवर्षी ८००,००० लाख लोक आत्महत्या करून मरतायत,तर ४५ कोटी लोक मानसिक आजाराशी लढा देत आहेत.सर्व साधारण आत्महत्याचे प्रमाण पाहिले तर ४० सेकंदाला एक आत्महत्या होतात.आत्महत्याचे जास्तीत जास्त प्रमाण पाहिले तर वय वर्षे २० ते ४० वयोगटातील आहे.आत्महत्या प्रमाण ग्रामीण  पेक्षा शहरी जास्त दिसून येत आहे.याचा विचार करता,आपण मानसिक आरोग्य विषयी सजग होऊन आत्महत्या प्रमाण कमी करण्यास प्रयत्न करूया. वर्ल्ड हेल्थ अॉर्गनायझेशन(WHO)कडून १९९४ पासून प्रत्येक वर्षी एक थीम ठरवली जाते.या वर्षी Mental health promotion and prevent suicide अर्थात  मानसिक आरोग्य जागृती करून आत्महत्या कमी करूया.ही थीम आहे. आज आपण वर्तमानपत्र,टि.व्ही.न्युज,मिञ-मैञीन,नातेवाईक,तर प्रत्यक्ष कुठे ना कुठे आत्म...