आज १० अॉक्टोबर...
जागतिक मानसिक आरोग्य दिन.
"सजगता जीवनाची गुरुकिल्ली"
आज १० अॉक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिन,१९९२ सालापासून वर्ल्ड हेल्थ अॉर्गनायझेशन(Who)ने मानसिक आरोग्य जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रथम सुरूवात केली.तर
जगभरात मानसिक आरोग्य सुधारण्यास व आत्महत्या रोखण्यास बरेच प्रयत्न चालू आहेत.दरवर्षी ८००,००० लाख लोक आत्महत्या करून मरतायत,तर ४५ कोटी लोक मानसिक आजाराशी लढा देत आहेत.सर्व साधारण आत्महत्याचे प्रमाण पाहिले तर ४० सेकंदाला एक आत्महत्या होतात.आत्महत्याचे जास्तीत जास्त प्रमाण पाहिले तर वय वर्षे २० ते ४० वयोगटातील आहे.आत्महत्या प्रमाण ग्रामीण पेक्षा शहरी जास्त दिसून येत आहे.याचा विचार करता,आपण मानसिक आरोग्य विषयी सजग होऊन आत्महत्या प्रमाण कमी करण्यास प्रयत्न करूया.
वर्ल्ड हेल्थ अॉर्गनायझेशन(WHO)कडून १९९४ पासून प्रत्येक वर्षी एक थीम ठरवली जाते.या वर्षी Mental health promotion and prevent suicide अर्थात मानसिक आरोग्य जागृती करून आत्महत्या कमी करूया.ही थीम आहे.
आज आपण वर्तमानपत्र,टि.व्ही.न्युज,मिञ-मैञीन,नातेवाईक,तर प्रत्यक्ष कुठे ना कुठे आत्महत्या घडणाऱ्या केसेस ऐकतो/पहातो.हळहळ व्यक्त करतो,याच्या पलिकडे आपण कोणतीही भूमीका घेत नाही.
खरे तर सर्व श्रेष्ठ प्राण्यांमध्ये मणूष्य हा बुध्दीमान प्राणी म्हणून गणला गेला आहे.ज्याला विचार करता येतो,चांगले वाईट याची पारख करता येते.आणि याच गोष्टीमुळे मनूष्य एवढा विचार करू लागला आहे की निसर्गाच्या पुढे पळण्याची जनू काही स्पर्धाच करत आहे.याच स्पर्धात्मक युगात आपल्याला सुख म्हणजे काय हे विसरून,सुखाच्याच शोधात भरकटताना दिसत आहे.जसे एखादी कस्तुरी मृग आपल्या बेंबी जवळ असणाऱ्या सुगंधी ग्रंथीचा शोध संपूर्ण जंगल भर शोधत असते.ते शोधता-शोधता जीवन संपूण जाते पण सुंगध सापडत नाही.अशीच काहीशी फजीती आपल्या बाबतीत झाली आहे.
आपण ते सुख आनंद शोधत असताना,अनेक प्रकारच्या मानसिक विकृतींना जन्म देत असतो.याची सुरूवात छोट्याशा बीजा पासून होते,व जस जसे मोठे होइल तसे काटेरी वृक्षात निर्माण होऊन जाते.त्यातून बाहेर पडण्यात आयुष्य पणाला लागते. या साठी ते बीज कशाचे आहे,त्याचा पुढे उपयोग होईल का? याची माहिती जाणीव असणे फार अवश्यक असते.आपण ही असेच बीज पेरत असतो.चिंतेचे,तणावाचे ते काही अंशी असायला हवी.पण आपण सतत त्याच बीजाची पेरणी करत रहातो.आणि संपूर्ण शेत काटेरी झुडपाने भरून जाते.ते जेवढे काढायला जाऊ तेवढे ञास दायक ही आहे.परंतु काढून झाल्यानंतर ही त्याची पुन्हा वाढ व्हायला सुरूवात होते.कारण ते जो पर्यंत मुळापासून निघत नाही तो पर्यंत पुन्हा-पुन्हा ते रहाणार.आणि कित्येक वर्ष त्या शेतामधून चांगले पिक घेता येणार नाही.आणि आपण कंटाळून ती शेती विकून टाकतो.काहीच शेतकरी असे असतात.की पुन्हा नव्याने मेहनत करून पूर्वी सारखी भुसभुशीत साजेशी शेती निर्माण करतात.
आपले सुध्दा असेच आहे.आपण ही आपल्या मनात चिंता,तणावाची पेरणी करतो ती एकदा नाही तर वर्षे न वर्षे सतत करत रहातो.त्यातून नैराश्य,निद्रानाश,फोबिया,सारखे महाभयंकर वृक्षांची वाढ होते.आणि आपण ही हातबल होऊन आपल्या जीवनाची शेती संपवायला सुरूवात करतो.त्यातील ही एखादा शेतकरी पुन्हा उभा रहातो.व सजगतेने समजून उमजून नव्याने शेतीची मशागत करतो.
ही मशागत माञ आगोदरच व्हायला हवी होती.बी- यान्यांची पारख व्हायला हवी.त्याचे सदउपयोग व माहिती असायला हवी.आणि ती करण्यासाठी सशक्त सजग शेतकरी हवा! आज पासून तुम्ही ही आपल्या मनात पेरणारे विचार कसे आहेत,काय आहेत.यांना सजगतेने पहा.जाणा समजून घ्या.आणि त्याची योग्य पेरणी करायला शिका.
आपल्या मनात दिवसाला ६०ते७० हजार विचार येत असतात.ते विचार ही एक मनाची अवस्था आहे.मृगजळा सारखी,सतत येत असतात,जात असतात.त्यांना पहा सजगतेने त्याची नोंद ठेवा.प्रतिक्रिया देऊ नका.प्रतिक्रिया देणे म्हणजे सतत ची पेरणी करणे.ती पेरणी थांबवून जे जसे आहे तसे त्याला त्याला पहा.सवयीने तुमच्या ही मनाची मशागत होईल.हे जेवढे सोपे वाटते तेवढे सोपे नाही.याला प्रयत्नांची सरावाची गरज आहे.यातून तुम्हाला ही सापडेल "सजग जीवनाची गुरुकिल्ली"
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
अधिक माहिती मिळवा.
-राहुल दळवी
माईंडफुलनेस प्रशिक्षक
07066217153

Comments
Post a Comment