*🧘🏻♂️आत्मभान🧘🏻♂️*
वाढीस माइंडफुलनेस(MBT)मोलाचे.
आपण काय करतो,आपल्याला काय हवे,नक्की मी कोण याची आपल्याला स्पष्टता नसते.या मुळे आपण स्व:बद्दल सजग नसतो.आपण भरकटून जातो.आपल्या स्व:ताचे स्वतः हा बद्दलचे मत रहात नाही.इतर व्यक्तींनी आपल्या बाबत केलेले मत म्हणजे आपले मत वाटते.
इतरांनी आपल्या विषयी मांडलेल्या मतांच्या प्रवाहा मध्येच आपण वाहत रहातो.आणि आपल्या व्यक्तीमत्वाचा एक भाग बनून जाते.याचा परिणाम आपले वागणे बोलण्यावरती होत आसतो.आपल्याला आपले विचार भावना आपले अस्तित्व वेगळे आहे याची सजगता जाणिव रहात नाही.ही सजगता निर्माण व्हायला हवी.सजगता निर्माण नाही झाली तर आपल्याला नकोसे वाटणारे विचार,ञासदायक विचार भावना यांची घुसमट होते.माञ आपण ते बदलण्यासाठी प्रयत्न करत नाही.इतरांनी लावलेल्या मतांनुसारच आपण जगत रहातो.आपण एखादा निर्णय घेतला की त्याच्या परिणामांशी लढण्यासाठी मानसिक धैर्य कमी पडते.यातून तणाव निर्माण होतो.आपण स्व:ताला हरवून बसतो.आपला आत्मविश्वास इतरांनी केलेल्या कौतुकामध्येच आडकून रहातो.आपण दूसर्यांच्या विचारांनी जगायला लागतो.कोणी काही बोलले तरी आपण लगेच आपली किंमत ठरवू लागतो.कमीपणा,सत्ता गाजवणे,स्व:ताचे महत्त्व,यामुळे आपण दुसऱ्यांचे स्वतंत्र अस्तित्व स्विकारण्यास तयार नसतो.यातून तणाव वाढत जातो,मानसिक अवस्था अस्थिर होते.यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे आत्मभान.आपले विचार भावना यांचा स्विकार करायला शिकला हवे.मला काय करायचे आणि काय नाही याची सजगता जाणिव व्हायला हवी. जर आपणच आपला स्विकार नाही केला तर दुसरे आपला स्विकार कसे करतील व आपण त्यांच्याकडून कशा अपेक्षा ठेवू शकतो.या साठी प्रथम आपण आपला आत्मस्वीकार करायला हवा.मला काय वाटते ही मानसिक आरोग्यातील मुलभूत मनोवस्था आहे.
माइंडफुलनेस सरावाने व अभ्यासाने आत्मभान वाढवले जाते.स्व:ची ओळख होते.मी कोणी मोठा आहे.माझी मते योग्य आहेत ती दुसऱ्यांनी ही अमलात आणायला हवीत.हा दृष्टिकोन बदलून जातो. आत्मस्वीकार निर्माण होतो.
*आत्मभान वाढ विद्यार्थी दशेतून व्हायला हवी.आपल्या पाल्यांना आत्मभान वाढीचे ध्यान शिकवायला हवे व स्व:ताही करायला हवे.सरकारने ही शाळांमध्ये अनापानसती ध्यान शिकवण्याची परवानगी विपश्ना सेंटरला दिली आहे.अनेक शाळांमध्ये अता सजग ध्यान शिकवले जात आहेत.*
आम्ही ही आमच्या संस्थेमार्फत अॉनलाईन/अॉफलाईन कोर्स घेत आसतो.आमच्या कोर्स मध्ये सहभागी होण्यासाठी खालील व्हाटसअप नंबर वरती नाव नोंदनी करावी.
7066217153
🖋️राहुल सि.दळवी.
माइंडफुलनेस प्रशिक्षक:संशोधक
Comments
Post a Comment