Skip to main content

*मानसिक तणाव,चिंता,रक्तदाबास,अनापानसती ध्यानाची  गरज*.



*मानसिक तणाव,चिंता,रक्तदाबास,
अनापानसती ध्यानाची  गरज*.

    आज आपल्याला शांततेची गरज असूनही आपण शांत रहाण्याचा प्रयत्न करत नाही.कारण आपल्या व्यस्त जीवनातून बाहेर डोकावून पहाण्यास वेळ मिळेनासा झाला आहे.याचातुनच मानसिक तणाव,चिंता,रक्तदाब,सारखे अनेक भस्मासुर आपले जीवन भस्म करण्यास पहात आहेत.या भास्मासुरांवर विजय मिळवायचा असेल तर शांततास्तिथी गरजेची आहे.आज प्रत्येकाला रक्तदाब,सारख्या विकृतीने ग्रासून टाकले आहे.जिकडे जाईल जाईल तिकडे रक्तदाब असणार्या सरास व्येक्ती पहायला मिळतायत.याचे मुळ म्हणजे मानसिक तणाव,चिंता,
       रक्तदाब,असणार्या प्रत्येक व्येक्तीला महिना,पंधरा,दिवसांनी हॉस्पिटलची चक्कार मारावी लागते.सतत गोळ्यांचा बदल करावा लागतो.याला तर व्यक्ती वैतागल्या आहेत.कालच मला एक ओळखीचे ग्रस्त हॉस्पीटल मध्ये भेटले,मी सहज त्यांना विचरले आज इकडे कसे काय,कोणी आजारी आहे का?.मी विचारताच त्यांनी बोलायला सुरवात केली,गेली ३० वर्षापासून महिना,दिडमहिण्यातून डॉ.देशपांडे यांचाकडे रक्तदाब साठी गोळ्या चालू आहेत.सकाळ,संध्याकाळ न चुकता गोळ्या घ्याव्या लागतात.कंटाळाआलाय आता या गोळ्यांचा पण पर्याय नाही.रक्तदाब काही पाठ सोडत नाही.कालच डॉक्टरांना भेटायला गेलो पण ते आता परदेशी मुलाकडे गेले आहेत.माझ्या गोळ्या हि संपल्या आहेत.नातेवाईकानी या डॉक्टरांचे नाव सुचवले म्हणून आलो आहे.पाहू आता काय सांगतात,त्याच गोळ्या घ्यायचा कि पुन्हा बदलून घायचा ते,३० वर्ष म्हणजे झाले काय.या ३० वर्षात ते देवाला एखाद्या वेळी नमस्कार करायला विसरेले असतील पण गोळ्या घ्यायला मात्र विसरले नाही.किती तणाव मुक्त जीवन याचातून बाहेर पडण्यासाठी आज आपल्याला अनापानसती ध्यानाची खूप गरज आहे.
     आपल्या मनामध्ये अनेक विचारांचा/भावनेचा गोंधळ उडतो,युद्धस्थिती निर्माण होते. तेव्हा आपल्या रक्तातील blood lactate नावाचे रसायन वाढते,तेव्हा मानसिक तणाव,चिंता,रक्तदाब,वाढतो.याच्या विरुद्ध ध्यानाने हे प्रमाण कमी होते.श्वासाची गती मंदावते,स्नायू रिल्याक्स होतात.रक्तदाब कमी होतो.ऑक्सिजनचा वापर कमी होतो.व ध्यानाने रक्तातील lactate कमी होते.मनाला कोणतेही संकट जाणवत नाही.शरीर शांतता स्थितीत जाते,रिल्याक्स होते.म्हणजेच ध्यानाने शरीर व मनाची शांतता स्थिती निर्माण होते.एवढेच नव्हे तर जप,नामस्मरण,करण्याने हि शांतता स्थिती निर्माण होते.असे १९६७ साली झालेल्या संशोधनात डॉ.हर्बर्ट बेन्सन यांना आढळून आले आहे.
      मानसिक तणाव असताना,आपले मन,शरीर विचारांच्या  गोंधळात आसते.मनाची शरीराची युद्धस्थिती निर्माण झालेली आसते.यातून निर्माण होणार्या आजारातून बाहेर पडण्यासाठी ध्यान एक उपचार पध्दत म्हणून वापरता येईल.असे अनेक प्रयोग डॉ.बेन्सन यांनी केले आहेत.१९७५ साली डॉ.हर्बर्ट बेन्सन यांनी the Relaxation Response हे पुस्तक हि लिहले होते.ते पुस्तक अमेरिकेत लोकप्रिय झाले.टिव्ही,न्यूजपेपर,वरती मुलाखत झळकत राहिल्या.
     आपल्यला हि तणाव मुक्त होण्यासाठी वैज्ञानिक अनापानसती ध्यान गरजेचे आहे.
    पद्मासन अथवा खुर्ची वरती शांत रिल्याक्स अवस्थेत बसून घ्या.व आपल्या नैसर्गिक श्वासावरती लक्ष ठेवा.आत येणाऱ्या व बाहेर जाणार्या श्वासाचे निरीक्षण करा.श्वास आत व बाहेर जात असताना थंड आहे कि गरम याचा वरती लक्ष ठेवून निरीक्षण करा.श्वास आत व बाहेर येताना जाताना डाव्या नाकपुडीतून येतो कि उजव्या याचे हि निरीक्षण करा.श्वास दोन्ही नाकपुडीतून आत येतो कि बाहेर जातो याचे हि निरीक्षण करा.श्वास स्थूल आहे कि सूक्ष्म याचे हि निरीक्षण करा.डोळे उगड्ल्या नंतर एक मिनिट तसेच शांत बसून रहा.
    हे ध्यान प्रत्येक दिवशी सकाळी संध्याकाळी करा.आपले आरोग्य सुखी व समृध्द बनवा.
http://bookhungama.com/Manache-Operation-Session-1/
   अधिक माहितीसाठी व ट्रेनिंग साठी संपर्क करा व
   आपल्या प्रतिक्रिया जारूर कळवा.

         राहुल दळवी
   माईडफुलनेस थेरपिस्ट व ट्रेनर
   वैज्ञानिक संमोहन मार्गदर्शक.
        07066217153

Comments

Popular posts from this blog

 भाग१ माईंडफुलनेस आणि व्यसन *"डिफॉल्ट मोड नेटवर्क" परिणाम व उपयोग*  *डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हणजे काय?* आपण जेंव्हा कोणत्याही प्रकारचे शारीरिक काम करत नसताना शांत बसलो असताना,आपण भूत,भविष्य, काळातील गोष्टींच्या विचार,कल्पना मध्ये सक्रीय होणे म्हणजे (DMN) डिफॉल्ट मोड नेटवर्क होय. याचा परिणाम जेवढा चांगला,तेव्हढाच दुष्परिणाम   *चांगला परिणाम.* आत्मचिंतन करणे, भविष्यातील योजना आखणे, सामाजिक व समाजातील कुटुंबातील नातेवाईक आप्तेष्ट यांच्या बद्दल चांगला विचार करणे,यासाठी महत्वाचा आहे. परंतु जास्त प्रमाणात सक्रिय DMN जास्त प्रमाणात विचार,चिंता, डिप्रेशन  सारख्या मानसिक आरोग्य वाढीसाठी घातक आहे.याचा (ADHD)"अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी" म्हणजे अवधान अस्थिरता आणि अतिक्रियाशीलता विकृती, तसेच Alzheimer's विकार म्हणजे स्मरणशक्ती कमी होणे,विचार आणि निर्णय क्षमता कमी होणे,वर्तनामध्ये बदल,सामाजिक कौशल्ये कमी होणे, अशा विकारांशी संबंध येऊ शकतो. अती व्यसनाधीन मित्रांमध्ये याचा खूप धोका जाणवतो,व्यसनी मित्रांमध्ये जास्त विचार करण्याची प्रवृत्ती(चिंता) एकांत राहणे, स्वतःमध्ये केंद्...

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन.सप्टेंबर १०.

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन               १० सप्टेंबर    जीवन खुप सुंदर आहे,त्याला आनंदाने जगाता यायला हवे! निसर्ग निर्मित प्राण्यांमध्ये सर्वांत बुध्दीमान प्राणी हा मनूष्य आहे.तरीही तोच आत्महत्याला बळी पडतो.याच्या सारखी भयानक परिस्थिती दुसरी नसेल असे वाटते. आपल्या आजूबाजूला अनेक सरपटणारे व सस्तन प्राणी आपण पहात असतो.माञ त्यातील एखाद्या सापाने किंवा कुञ्या-मांजराने आत्महत्या केली,असे कधी ऐकण्यात आले आहे का? नाही ना.कारण त्यांच्या मेंदूच्या वाढीमध्ये pre-frontal cortex भागाची वाढ झालेली नसल्या कारणाने त्यांना विचार करता येत नाही.चांगले वाईट समजत नाही. तोच pre-frontal cortex चा भाग(मोठा मेंदू)मानवाला निसर्गाकडून देणगी स्वरूपात मिळालेला आहे.त्यामुळेच मानूस विचार करतो,चांगले वाईटांची त्याला पारख कळते.तरीही आपण माञ त्याचा वापर करायला कमी पडतो.नको असणाऱ्या विचारांचे ओझे डोक्यावरती(मेंदूत साठवून)ठेवतो.चिंतन करणे,सोडून चिंता करतो.तणावयुक्त जीवन जगत असतो.त्यातूनच मानसिक समस्या उदभवायला लागतात.आणि आत्महत्या/चिड-चिड,रागासारखे विचार/भावना म...

व्हिज्युअलायझेशन

#कल्पना_ध्यान(व्हिज्युअलायझेशन ) व्हिज्युअलायझेशन  म्हटले की अनेकांच्या मनात एक जादू आसल्यासारखे वाटते.फक्त कल्पना करूण आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी आपले स्वप्न आपण पूर्ण करू अशा भ्रामक समजूती आपल्या समाजामध्ये दृढ झालेल्या आढळून येऊ लागल्या आहेत. एक विचार करा.फक्त कल्पना करण्यांनी आपल्याला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी मिळवता येतात का?कि त्याला ही प्रयत्नांची जोड द्यावी लागते.जेंव्हा याचे चिंतन कराल तेंव्हा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे सापडल्या शिवाय रहाणार नाहीत. आज अनेक मंडळी,#माईंडफुलनेस कार्यशाळा संदर्भात विचारत असताना.मला #व्हीज्युअलायझेशन हे कितपत उपयोगी आहे का? ते करायला हवे का? आम्ही #द_सिक्रेट हे पुस्तक वाचले,अनेक वेळा या विषयी ऐकले ही आहे.अनेक व्यक्ती यशस्वी झालेत ते कसे काय? #आपण_ते_पाहू_या! आपण दहावी/बारावी ला आहोत.आपल्याला येणाऱ्या बोर्ड परिक्षा मध्ये पास होण्याचे आहे. आणि आपण फक्त अभ्यास करण्याची कल्पना करत बसलो.व प्रत्यक्षात अभ्यास केलाच नाही तर बोर्ड परिक्षा पास होईल की नापास.आपण नक्कीच परिक्षेमध्ये शेवट हून पहिला नंबर काढलेला आसेल.व माञ आपण प्र...