भाग१ माईंडफुलनेस आणि व्यसन *"डिफॉल्ट मोड नेटवर्क" परिणाम व उपयोग* *डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हणजे काय?* आपण जेंव्हा कोणत्याही प्रकारचे शारीरिक काम करत नसताना शांत बसलो असताना,आपण भूत,भविष्य, काळातील गोष्टींच्या विचार,कल्पना मध्ये सक्रीय होणे म्हणजे (DMN) डिफॉल्ट मोड नेटवर्क होय. याचा परिणाम जेवढा चांगला,तेव्हढाच दुष्परिणाम *चांगला परिणाम.* आत्मचिंतन करणे, भविष्यातील योजना आखणे, सामाजिक व समाजातील कुटुंबातील नातेवाईक आप्तेष्ट यांच्या बद्दल चांगला विचार करणे,यासाठी महत्वाचा आहे. परंतु जास्त प्रमाणात सक्रिय DMN जास्त प्रमाणात विचार,चिंता, डिप्रेशन सारख्या मानसिक आरोग्य वाढीसाठी घातक आहे.याचा (ADHD)"अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी" म्हणजे अवधान अस्थिरता आणि अतिक्रियाशीलता विकृती, तसेच Alzheimer's विकार म्हणजे स्मरणशक्ती कमी होणे,विचार आणि निर्णय क्षमता कमी होणे,वर्तनामध्ये बदल,सामाजिक कौशल्ये कमी होणे, अशा विकारांशी संबंध येऊ शकतो. अती व्यसनाधीन मित्रांमध्ये याचा खूप धोका जाणवतो,व्यसनी मित्रांमध्ये जास्त विचार करण्याची प्रवृत्ती(चिंता) एकांत राहणे, स्वतःमध्ये केंद्...

Comments
Post a Comment