Skip to main content

"मन करा रे प्रसन्न,सर्व श्रध्देचे कारण"

"मन करा रे प्रसन्न,सर्व श्रध्देचे कारण"
 

श्रध्दा म्हटल्यावर आपल्याला जास्त काही सांगण्याची गरज नाही.आपण आपल्या देवावरती,आई-वडीलांवरती खुप श्रध्दा ठेवून असतो,थोडा विचार करा.खरच प्रामाणिक आपण श्रध्दा ठेवतो का?स्वतःच्या मनाला विचारा.

आजच्या नवयुगात श्रध्दा/विश्वास काय असते तेच मुळात आपण विसरून गेलेलो आहोत.देवावरती असणारी श्रध्दा सुध्दा मोह,लालसा,लोभा पोटी ठेवली जाते.आई-वडीलांच्या बाबत ही असेच काही से आहे.नक्की श्रध्दा काय हेच आपल्याला माहिती नाही.फक्त त्याचा अर्थ आपण जाणतो पण प्रत्यक्षात उतरवत नाही.ज्या वेळी श्रध्दा समजेल तेंव्हा वयोवृध्द आश्रम बंद झाल्या शिवाय रहाणार नाहीत.आपल्या जीवनात मानसिक स्वास्थ्यासाठी श्रध्दा काळाची गरज आहे.
श्रध्देची लक्षणे दोन प्रकारे आहेत,एक प्रसन्नता व दूसरी महत्वकांक्षा,आज आपल्याकडे प्रसन्नता आहे का?या धावपळीच्या युगात प्रसन्नताच आपण विसरून गेलेलो आहोत.चेहऱ्यावर दाखवताना माञ प्रसन्न/आनंदी चेहरा दाखवतो माञ मनाच्या/मेंदूच्या गाभाऱ्यात तणाव युक्त स्थिती असते,युध्दस्थिती असते,आपण समोरच्याला तर आनंदी असल्याचा भास करून फसवतोच पण स्वतः ला सर्वात जास्त फसवत रहातो.

या लालसे सोबतच आपण सतत शंका/कुशंका ची सवय माञ मनाला लावून ठेवली आहे,सतत काहीना काही शंका आपल्या मनात चालू आसते,आणि त्यातून निर्माण होतो राग,द्वेष आणि गर्व.मीच शहाना मलाच सगळे येते,माझ्यासारखा दुसरा नाही.अशा अनेक भ्रमा सोबत आपण जगत असतो.आणि त्यातूनच मानसिक समाधान नाहीसे व्हायला सुरूवात होते.
आपण जर श्रध्दा पूर्वक,सजगतेने मनाची अवस्था समजू लागलो तर आपण शांत चित्ताने आनंदाने भरून जातो.सजगतेने श्रध्दा ठेवल्यास मनातील लालसा,मोह,लोभ नाहीसा होतो.मनात कोणत्याही प्रकारची शंका/कुशंका निर्माण होत नाही,कोणा विषयी राग,द्वेष निर्माण होत नाही,गर्व नाहिसा होतो.व आंतरिक व मानसिक शांतता लाभते.हे जेवढे सहज सोपे वाटते.तेवढे आज ते सहज सोपे राहिले नाही.या साठी खुप प्रयत्नांची गरज आहे.ते सर्व प्रयत्न सजगता ध्यानातून आपल्याला साध्य करता येतात.

आपल्या मनाची अवस्था ओळखता येते,व महत्वकांक्षा निर्माण होते.आपले ध्येय गाठण्यासाठी सजग महत्वकांक्षा खुप मोलाची आहे.चला तर मग आज पासून श्रध्दा ठेवून मनाची अवस्था समजू,आनंदी उत्साही जीवन बनवू !

-राहुल दळवी
माईंडफुलनेस प्रशिक्षक
7066217153

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

 भाग१ माईंडफुलनेस आणि व्यसन *"डिफॉल्ट मोड नेटवर्क" परिणाम व उपयोग*  *डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हणजे काय?* आपण जेंव्हा कोणत्याही प्रकारचे शारीरिक काम करत नसताना शांत बसलो असताना,आपण भूत,भविष्य, काळातील गोष्टींच्या विचार,कल्पना मध्ये सक्रीय होणे म्हणजे (DMN) डिफॉल्ट मोड नेटवर्क होय. याचा परिणाम जेवढा चांगला,तेव्हढाच दुष्परिणाम   *चांगला परिणाम.* आत्मचिंतन करणे, भविष्यातील योजना आखणे, सामाजिक व समाजातील कुटुंबातील नातेवाईक आप्तेष्ट यांच्या बद्दल चांगला विचार करणे,यासाठी महत्वाचा आहे. परंतु जास्त प्रमाणात सक्रिय DMN जास्त प्रमाणात विचार,चिंता, डिप्रेशन  सारख्या मानसिक आरोग्य वाढीसाठी घातक आहे.याचा (ADHD)"अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी" म्हणजे अवधान अस्थिरता आणि अतिक्रियाशीलता विकृती, तसेच Alzheimer's विकार म्हणजे स्मरणशक्ती कमी होणे,विचार आणि निर्णय क्षमता कमी होणे,वर्तनामध्ये बदल,सामाजिक कौशल्ये कमी होणे, अशा विकारांशी संबंध येऊ शकतो. अती व्यसनाधीन मित्रांमध्ये याचा खूप धोका जाणवतो,व्यसनी मित्रांमध्ये जास्त विचार करण्याची प्रवृत्ती(चिंता) एकांत राहणे, स्वतःमध्ये केंद्...

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन.सप्टेंबर १०.

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन               १० सप्टेंबर    जीवन खुप सुंदर आहे,त्याला आनंदाने जगाता यायला हवे! निसर्ग निर्मित प्राण्यांमध्ये सर्वांत बुध्दीमान प्राणी हा मनूष्य आहे.तरीही तोच आत्महत्याला बळी पडतो.याच्या सारखी भयानक परिस्थिती दुसरी नसेल असे वाटते. आपल्या आजूबाजूला अनेक सरपटणारे व सस्तन प्राणी आपण पहात असतो.माञ त्यातील एखाद्या सापाने किंवा कुञ्या-मांजराने आत्महत्या केली,असे कधी ऐकण्यात आले आहे का? नाही ना.कारण त्यांच्या मेंदूच्या वाढीमध्ये pre-frontal cortex भागाची वाढ झालेली नसल्या कारणाने त्यांना विचार करता येत नाही.चांगले वाईट समजत नाही. तोच pre-frontal cortex चा भाग(मोठा मेंदू)मानवाला निसर्गाकडून देणगी स्वरूपात मिळालेला आहे.त्यामुळेच मानूस विचार करतो,चांगले वाईटांची त्याला पारख कळते.तरीही आपण माञ त्याचा वापर करायला कमी पडतो.नको असणाऱ्या विचारांचे ओझे डोक्यावरती(मेंदूत साठवून)ठेवतो.चिंतन करणे,सोडून चिंता करतो.तणावयुक्त जीवन जगत असतो.त्यातूनच मानसिक समस्या उदभवायला लागतात.आणि आत्महत्या/चिड-चिड,रागासारखे विचार/भावना म...

व्हिज्युअलायझेशन

#कल्पना_ध्यान(व्हिज्युअलायझेशन ) व्हिज्युअलायझेशन  म्हटले की अनेकांच्या मनात एक जादू आसल्यासारखे वाटते.फक्त कल्पना करूण आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी आपले स्वप्न आपण पूर्ण करू अशा भ्रामक समजूती आपल्या समाजामध्ये दृढ झालेल्या आढळून येऊ लागल्या आहेत. एक विचार करा.फक्त कल्पना करण्यांनी आपल्याला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी मिळवता येतात का?कि त्याला ही प्रयत्नांची जोड द्यावी लागते.जेंव्हा याचे चिंतन कराल तेंव्हा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे सापडल्या शिवाय रहाणार नाहीत. आज अनेक मंडळी,#माईंडफुलनेस कार्यशाळा संदर्भात विचारत असताना.मला #व्हीज्युअलायझेशन हे कितपत उपयोगी आहे का? ते करायला हवे का? आम्ही #द_सिक्रेट हे पुस्तक वाचले,अनेक वेळा या विषयी ऐकले ही आहे.अनेक व्यक्ती यशस्वी झालेत ते कसे काय? #आपण_ते_पाहू_या! आपण दहावी/बारावी ला आहोत.आपल्याला येणाऱ्या बोर्ड परिक्षा मध्ये पास होण्याचे आहे. आणि आपण फक्त अभ्यास करण्याची कल्पना करत बसलो.व प्रत्यक्षात अभ्यास केलाच नाही तर बोर्ड परिक्षा पास होईल की नापास.आपण नक्कीच परिक्षेमध्ये शेवट हून पहिला नंबर काढलेला आसेल.व माञ आपण प्र...