Skip to main content

सजगतेचे भान

सजगतेचे भान

    कित्येक वेळी आपण आपले भान हरपून काही गोष्टी करत आसतो.ती गोष्ट काही वेळाने,काळाने,आपल्या लक्षात येते तेंव्हा वेळ निघून गेलेली आसते.आणि आपण त्या घडून गेलेल्या गोष्टीचा पश्चाताप करत बसतो.स्व:ताला स्व:ताच दोष देत रहातो.कित्येकदा आपण ठरवलेले देखील आसते कि आता असे वागायचे नाही.पुन्हा ती चूक करायची नाही.तरी देखील पुढील वेळेस भान हरपून आपण ती चूक करतो.आणि पुन्हा नंतर पश्चाताप करत आसतो.असे का? बरे घडत असावे.
 
आपण आपल्या मेंदूला सतत काहीना काही प्रतिक्रिया देत आसतो.त्यातून रागाचा भावना,द्वेषाचा भावना,उत्पन्न होत असतात.आपण जी प्रतिक्रिया देणार त्या वरती ती भावना तशीच निर्माण होते.ही क्रिया एवढी जलद होते कि क्षणार्धात घडून जाते.ते आपल्याला कळत देखील नाही.त्याची प्रतिक्रिया आपल्या शरीराद्वारे,कृतीद्वारे,उमटते.याला जबाबदार आपणच आसतो.

लहान-लहान गोष्टीवरून सतत रागाचा भावनिक प्रतिक्रिया देणे.त्या सतत च्या प्रतिक्रिया मुळे मेंदूला त्याची सवय जडते.तशी एखादी घटना घडली कि क्षणार्धात मेंदू कडून प्रतिक्रिया येते आणि आपण तसे वागायला भाग पडतो.कारण आपण स्व:ताच आपल्या मेंदूला त्या सवयीमध्ये गुरफडून ठेवलेले आसते.ती सवय मोडायची म्हटले तरी खूप त्रास होतो.कारण त्या प्रतिक्रियांनी तीव्र रूप धारण केलेले आसते.काही वेळा मेंदूतील रासायनिक बिघाड हि होण्यास सुरुवात होते.आणि आपण तणाव युक्त जीवन जगण्यास सुरुवात करतो.त्याचातुनच रक्तदाब,आल्सर,सारखे शारीरिक व मानसिक आजारास सुरुवात होते.आणि आपले मानसिक संतुलन बिघडून जाते.

आपले मानसिक व शारीरिक आरोग्य जर चांगले ठेवायचे असेल तर प्रत्येक गोष्टीत भान ठेवून जगायला शिकले पाहिजे.मेंदूला चांगल्या अथवा वाईट प्रतिक्रिया देण्यापासून सजग रहायला हवे.हे बोलून किंवा माहिती घेवून महत्वाचे नाही.तर त्याची कृती करणे आणि अनुभव घेणे महत्वाचे आहे.

माझा एक मित्र होता जयेश,हॉस्पिटल फिल्ड मध्ये काम करायचा,खूप चांगला मुलगा होता,प्रत्येक गोष्टीत लक्ष देवून काम करत असत.त्याला कामाचा तान वाढू नये म्हणून त्याचा सोबतीला एक राज नावाचा मुलगा दिला.तोही तेवढाच मेहनती आणि हुशार होता.काही दिवस त्यांचे मैत्रीचे नाते चांगले चाले होते पण काही दिवसानंतर जयेश मात्र त्याचा राग-राग करायला लागला.त्याचावर चिडचिड करायला लागला.त्याचा त्या चिडचिड आणि रागाचा परिणाम त्याचा कामावरती होऊ लागला.सतत कामामध्ये चुकी करायला लागला.बेजाबाबदार रहायला लागला.त्याच्या या वागण्याने त्याला त्याची नोकरी गमवावी लागली.

काही दिवसापूर्वी मला तो मुंबई मध्ये भेटला,त्याची विचारपूस केली.तेव्हा त्याने बोलायला सुरुवात केली,सध्या मी घरीच आसतो.मनोविकारतज्ज्ञ यांचा गोळ्या चालू आहेत.पूर्वी पेक्षा बारा आहे.मी त्याला सहज विचारले तू एवढा हुशार,कामामध्ये आमचा ही पेक्षा वरचढ तुला अचानक असे का झाले.राग-राग का करायला लागलास,का चिडचिड करायचास काही घरी प्रोब्लेम होता का?

त्याने बोलायला सुरुवात केली.माझा जोडीदार राज आणि मी खूप चांगले मित्र होतो.मी त्याला सगळे काम शिकवले,तो हि खूप हुशार आणि चांगला होता.आगोदर तो पुढे-पुढे काम करताना मला विश्रांती मिळायची पण नंतर-नंतर त्यालाच सगळे काम सांगायचे प्रत्येक गोष्टीत तो पुढे असायचा,मला ते खूप हार्ट व्हायचे.त्याचा मुळे मी स्वताला कमी लेखायला लागलो.माझी खूपच चीड-चीड वाढली.स्वताचा राग वाटू लागला.कामामध्ये मन लागेना,त्यातून मला माझी नोकरी गमवावी लागली.याचा खूपच परिणाम माझा वरती झाला घरी ही सगळ्यांशी भांडण होत रहायचे. मी काय करतो व काय नाही मलाच कळत नव्हते.वडिलांनी हॉस्पिटल मध्ये भरती  केले होते आता गोळ्या चालू आहेत.आता थोडे बरे वाटते .

त्याची अशी परिस्थिती होण्याचे कारण काय असावे,स्वतःहून केलेली चुकी आणि त्याला सतत वाटणाऱ्या द्वेषाचा,रागाचा सतत  मेंदूला तीव्र स्वरूपाचा प्रतिक्रिया.आपणच आपली मानसिकता बनवायला आपणच भाग पडतो.

या साठी आपण भान ठेवून असणे खूप गरजेचे आहे.कसे वागावे व कोणत्या प्रतिक्रियांना कसे सामोरे जावे याचे भान ठेवणे खूप महत्त्वाचे,आणि माईंडफुलनेस  सजगता ध्यान,हेच आपल्याला शिकवते.योग्य विचार करण्याची क्षमता ठेवणे.मेंदूकडून येणाऱ्या भावनिक प्रतिक्रियांना,प्रतिक्रिया न देता पहाणे.विचार करताना,बोलताना,चालताना,बसताना,क्षणा-क्षणाला प्रत्येक गोष्टीत सजगता ठेवायला भान ठेवायला या सजगता ध्यान,मधून शिकायला मिळते.

            राहुल दळवी
      माईंडफुलनेस प्रशिक्षक
          7066217153

Comments

Popular posts from this blog

 भाग१ माईंडफुलनेस आणि व्यसन *"डिफॉल्ट मोड नेटवर्क" परिणाम व उपयोग*  *डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हणजे काय?* आपण जेंव्हा कोणत्याही प्रकारचे शारीरिक काम करत नसताना शांत बसलो असताना,आपण भूत,भविष्य, काळातील गोष्टींच्या विचार,कल्पना मध्ये सक्रीय होणे म्हणजे (DMN) डिफॉल्ट मोड नेटवर्क होय. याचा परिणाम जेवढा चांगला,तेव्हढाच दुष्परिणाम   *चांगला परिणाम.* आत्मचिंतन करणे, भविष्यातील योजना आखणे, सामाजिक व समाजातील कुटुंबातील नातेवाईक आप्तेष्ट यांच्या बद्दल चांगला विचार करणे,यासाठी महत्वाचा आहे. परंतु जास्त प्रमाणात सक्रिय DMN जास्त प्रमाणात विचार,चिंता, डिप्रेशन  सारख्या मानसिक आरोग्य वाढीसाठी घातक आहे.याचा (ADHD)"अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी" म्हणजे अवधान अस्थिरता आणि अतिक्रियाशीलता विकृती, तसेच Alzheimer's विकार म्हणजे स्मरणशक्ती कमी होणे,विचार आणि निर्णय क्षमता कमी होणे,वर्तनामध्ये बदल,सामाजिक कौशल्ये कमी होणे, अशा विकारांशी संबंध येऊ शकतो. अती व्यसनाधीन मित्रांमध्ये याचा खूप धोका जाणवतो,व्यसनी मित्रांमध्ये जास्त विचार करण्याची प्रवृत्ती(चिंता) एकांत राहणे, स्वतःमध्ये केंद्...

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन.सप्टेंबर १०.

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन               १० सप्टेंबर    जीवन खुप सुंदर आहे,त्याला आनंदाने जगाता यायला हवे! निसर्ग निर्मित प्राण्यांमध्ये सर्वांत बुध्दीमान प्राणी हा मनूष्य आहे.तरीही तोच आत्महत्याला बळी पडतो.याच्या सारखी भयानक परिस्थिती दुसरी नसेल असे वाटते. आपल्या आजूबाजूला अनेक सरपटणारे व सस्तन प्राणी आपण पहात असतो.माञ त्यातील एखाद्या सापाने किंवा कुञ्या-मांजराने आत्महत्या केली,असे कधी ऐकण्यात आले आहे का? नाही ना.कारण त्यांच्या मेंदूच्या वाढीमध्ये pre-frontal cortex भागाची वाढ झालेली नसल्या कारणाने त्यांना विचार करता येत नाही.चांगले वाईट समजत नाही. तोच pre-frontal cortex चा भाग(मोठा मेंदू)मानवाला निसर्गाकडून देणगी स्वरूपात मिळालेला आहे.त्यामुळेच मानूस विचार करतो,चांगले वाईटांची त्याला पारख कळते.तरीही आपण माञ त्याचा वापर करायला कमी पडतो.नको असणाऱ्या विचारांचे ओझे डोक्यावरती(मेंदूत साठवून)ठेवतो.चिंतन करणे,सोडून चिंता करतो.तणावयुक्त जीवन जगत असतो.त्यातूनच मानसिक समस्या उदभवायला लागतात.आणि आत्महत्या/चिड-चिड,रागासारखे विचार/भावना म...

व्हिज्युअलायझेशन

#कल्पना_ध्यान(व्हिज्युअलायझेशन ) व्हिज्युअलायझेशन  म्हटले की अनेकांच्या मनात एक जादू आसल्यासारखे वाटते.फक्त कल्पना करूण आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी आपले स्वप्न आपण पूर्ण करू अशा भ्रामक समजूती आपल्या समाजामध्ये दृढ झालेल्या आढळून येऊ लागल्या आहेत. एक विचार करा.फक्त कल्पना करण्यांनी आपल्याला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी मिळवता येतात का?कि त्याला ही प्रयत्नांची जोड द्यावी लागते.जेंव्हा याचे चिंतन कराल तेंव्हा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे सापडल्या शिवाय रहाणार नाहीत. आज अनेक मंडळी,#माईंडफुलनेस कार्यशाळा संदर्भात विचारत असताना.मला #व्हीज्युअलायझेशन हे कितपत उपयोगी आहे का? ते करायला हवे का? आम्ही #द_सिक्रेट हे पुस्तक वाचले,अनेक वेळा या विषयी ऐकले ही आहे.अनेक व्यक्ती यशस्वी झालेत ते कसे काय? #आपण_ते_पाहू_या! आपण दहावी/बारावी ला आहोत.आपल्याला येणाऱ्या बोर्ड परिक्षा मध्ये पास होण्याचे आहे. आणि आपण फक्त अभ्यास करण्याची कल्पना करत बसलो.व प्रत्यक्षात अभ्यास केलाच नाही तर बोर्ड परिक्षा पास होईल की नापास.आपण नक्कीच परिक्षेमध्ये शेवट हून पहिला नंबर काढलेला आसेल.व माञ आपण प्र...