Skip to main content

पॕनिक अटॕक

पॕनिक
डिसअॉर्डर

  पॕनिक अॕटॕक म्हणजे तिव्र स्वरूपाची भिती वाटणे.ह्दय जोरात धडधडणे,श्वासाची गती कमी जास्त होणे,चक्कर येणे,छातीत कळ येणे,ही पॕनिक अॕटॕक ची लक्षणे आहेत.

या मध्ये प्राथमिक स्वरूपाचे तीन घटक पॕनिक अॕटॕक मध्ये वर्णन केले जातात.

१) परिस्थितीनुसार येणारा अॕटॕक - उंच जागेची भिती वाटणे,घाटा मधून अथवा पुला वरून गाडी चालवणे,अशा ठिकाणी हा अॕटॕक येतो.

२) अनपेक्षित येणारा अॕटॕक - अचानक कधीही कुठेही येणारा पॕनिक अॕटॕक ज्याची आपण कल्पना  सुध्दा करू शकत नाही.

३) अनुकूल परिस्थितीत येणारा अॕटॕक - या मध्ये वरील दोन्हीची परिस्थिती आसणे,एखाद्या वेगळ्या परिस्थिती मध्ये हा पॕनिक अॕटॕक येईल किंवा येणार ही नाही.याचा अंदाज आपल्याला नसतो.
यातील अनपेक्षित व अनुकूल परिस्थितीत येणारे अॕटॕक,पॕनिक अॕटॕक मध्ये महत्त्वाचे आहेत.

अनुभव व प्रतिक्रिया या दोघांमध्ये मध्यस्थिचे काम करणारा आपली बुध्दीमत्ता आहे.ग्रहण क्षमता,दक्षता,सावधणता,याचा परिणाम व्यक्तीच्या प्रतिक्रियावर होतो.

आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या परिस्थितीला कोणत्या प्रतिक्रिया देतो यावरती आवलंबून आसते.या मध्ये चिंता विकृती व तिचे वेगवेगळे प्रकार याच्या संदर्भात बौद्धिक क्रियांचे कार्य महत्त्वाचे आहे.नियंत्रण व अंदाज व्यक्त करण्याची क्षमता याचे अचानक उद्भवणार्या संकटांचे चूकिच्या पध्दतीने स्वतःची जागृता,व विचारांचे दमण या विकृती साठी महत्त्वाचे ठरतात.

ज्यांना विश्वास असतो की आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या परिस्थितीवर घटणांवर नियंत्रण ठेवू शकतो.त्या व्यक्तीमध्ये चिंता फारशी दिसत नाही.माञ ज्यांना हा विश्वास नसतो त्यांना चिंता उद्भवतात व ते पॕनिक अॕटॕक ला बळी पडतात.हे सर्व आपल्या आतमधून घडत आसते.शरीरावरील संवेदना व कल्पनाचिञण मुळे ही चिंता निर्माण होते.त्यामुळे नकारात्मक भावनांशी संबंधीत शरीरावरील लक्षणे दिसू लागतात.त्यातून चक्कर येणे,ह्दय जोरानं धडपडणे,श्वासाची गती वाढणे,यातून शारीरीक संवेदनाकडे लक्ष एकञीत होते.यातून आपण चूकीचे आर्थ लावतो.ह्दय विकार झटका येतो का असे वाटणे,अशा अनेक चूकीचे विचार मनात चालू होतात.यातून भितीची भावना निर्माण होते. पॕनिक अॕटॕक उद्भवतात.

आपण लावलेले चूकीची कल्पना,चूकीची मते,
यांना सजगतेने साक्षी भावाने पहाणे योग्य ठरते.
या साठी सजगता खुप गरजेची आहे.
आपण सजगतेने जीवन जगण्यासाठी " #मनाचे #अॉपरेशन " अंतर्गत माईंडफुलनेस हा आमचा अॉनलाईन थेरपी व ट्रेनिंग उपल्बध आहे.
खालीला लिंक वापरूण आपण माहिती मिळवा व अधिक माहितीसाठी संपर्क करा.
http://bookhungama.com/Manache-Operation-Session-1/

                  राहुल दळवी
           माईंडफुलनेस प्रशिक्षक
               07066217153

Comments