Skip to main content

सजगता काळाची गरज

सजगता काळाची गरज
 
            आज आपल्याला खऱ्या अर्थाने जीवन जगण्यासाठी या नवयुगामध्ये सजगतेची खूप गरज आहे.आपल्या धकाधाकीचा जीवना मध्ये आपण एवढे व्यस्थ झालो आहोत कि आपण  आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे हि विसरून गेलो आहोत.मग ते विद्यार्थी असो कि गृहिणी असो ,उद्योजक असो कि नोकरदार,आपण सगळेच आपल्या करियर,प्रसिध्दी,पैसा,यांचा मागे लागून आपण आपल्या  मानसिक व मनोशारीरिक आजारास निमंत्रण देत आहोत.यामुळेच आपण आज रक्तदाब,शुगर,थायरॉइड,निद्रानाश,डिप्रेशन,व अनेक मानसिक मनोशारीरिक आजारांना बळी पडत आहोत .
         आज प्रत्येकाला आपले करियर, पैसा,प्रसिध्दी,हवी आहे.आणि ती मिळवणे हि गरजेचे आहे.ते मिळवत असताना आपण मानसिक व शारीरिक दृष्ट्या मजबूत असणे फार गरजेचे आहे. आपण मानसिक व शारीरिक दृष्ट्या मजबूत नाही राहिलो तर,कदापी आपल्याला आपल्या करियरचा,पैशाचा,प्रसिध्दीचा आनंद घेता येणार नाही.किंवा कदाचित आपण मानसिक व मनोरुग्ण होऊन जाऊ अथवा त्या मिळवलेल्या आनंदाचा सुखाचा उपभोग न घेताच एक मशीन म्हणून राहू.या पासून आपल्याला सावध रहायचे असेल तर प्रत्येक दिवशी सकाळी संध्याकाळी १० मिनिटे स्वतःला वेळ देणे गरजेचे आहे.हि २० मिनिटे आपले आयुष्य बदलून टाकतील.जीवन जगण्याचा नवा मार्ग दाखवतील,त्यासाठी आपल्याला २० मिनिटांचा वेळ देणे गरजेचे आहे.
         काय आहे ? या २० मिनिटांत.ज्या २० मिनिटांनी जीवन बदलून जाईल,अशी कोणती जादू आहे.असा प्रश्न मात्र तुम्हाला पडणे साहजिकच आहे.आणि तेच आपण पहाणार आहोत.
            या २० मिनिटांमध्ये आपली शांतता,एकाग्रता,स्मरणशक्ती,व विचार करण्याची नवी दृष्टी लपलेली आहे.म्हत्वाचे म्हणजे प्रज्ञा(योग्य विचार करण्याची शक्ती) या मध्ये आपल्याला सापडेल.या साठीच आपल्याला सजगता ध्यानाची गरज आहे.आणि तेच आपण समजून घेणार आहोत.अनेकांचा मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले असतील ध्यान करायला आम्ही काय संन्यासी आहोत का? कि म्हातारे झालो आहोत.ध्यानाने कधी विचार बदलतात का? असे अनेक प्रश्न पडलेले असतील.याचे उत्तर आहे हो ध्यानच आपल्याला आपले जीवन बदलण्यास भाग पाडेल.
          तुमचा मते ध्यान म्हणजे काय? शांत डोळे झाकून पद्मासन मध्ये बसने म्हणजे ध्यान  का? किवा मंत्र-जप करणे म्हणजे ध्यान का? तर नाही.ध्यान म्हणजे एखाद्या गोष्टीत लक्ष देणे,मग्न होणे,आपण बोलता बोलता हि बोलून जातो,कुठे बगतो रे जरा ध्यान दे कामावर.म्हणजेच लक्ष देणे,ते मग डोळे झाकून असो अथवा चालताना,बोलताना,खाताना,खेळताना,अभ्यास करताना,जी-जी गोष्ट आपण करत असतो त्या सगळ्या गोष्टीवर लक्ष देणे सावध रहाणे म्हणजेच सजगता ध्यान होय.आणि याचाच  उपयोग पूर्व काळामध्ये अनेक साधू-संतानी करून घेतला आहे.त्यालाच आज पश्चिमात्य देशामध्ये "माईडफुलनेस" म्हणतात याचा थेरपी म्हणून उपयोग केला जातो.पश्चिमात्य देशामध्ये हॉस्पिटल,शाळा,कॉलेज,सैनिक,यांना या सजगता ध्यानाचे प्रशिक्षण दिले जाते.याचा जन्म मात्र आपल्या भारत देशामध्ये खऱ्या अर्थाने झाला आहे.याच विद्येला,कलेला,आपण बर्याच वर्षापासून मुकलेलो होतो.
            फार वर्षापूर्वी पासून भारतामध्ये सजगता ध्यान शिकवले जायचे, २५०० वर्षापूर्वी आपल्याला तथागत बुद्धांनी हि ध्यान पध्दत शिकवली,त्याचा त्या वेळी अनेक ब्राम्हण,क्षत्रिय,शाक्य,शूद्र,राजे-महाराजे यांनी आपल्या जीवनाचे सार्थक करून घेतले.काही कालांतराने हि विद्या भारता मधून लुप्त झाली होती.ती पुन्हा एकदा आपल्याला   विपश्यनाचार्य गोयंका गुरुजीनी सजगता ध्यानाची ओळख करून दिली.आज संपूर्ण भारतभर व जगामध्ये  विपश्ना केंद्र चालू आहेत.त्याच बरोबर पतंजली साधू-संतानी हि याचा प्रचार - प्रसार केला आहे.हे सजगता ध्यान वैज्ञानिकतेने आपण पाहू.
           अलीकडील काळामध्ये म्हणजे, १९७९ साली डॉक्टर हर्बर्ट बेन्सन यांची, दलाई लामा यांचाशी भेट झाली व ते १९८० मध्ये त्यांचा सहकार्यांसोबत हिमालयातील लामा यांचा धर्मशाळा येथे गेले, व त्यांनी त्या ठिकाणी अनेक वर्षापासून ध्यान साधना करणाऱ्या तिबेटी बोद्ध भिखू यांचा वरती होणार्या सजगता ध्यानाचा काय परिणाम होतो याचा वरती संशोधन चालू केले.त्यातून त्यांचा असे लक्षात आले कि ते बौद्ध भिखू रक्त गोठणाऱ्या थंडी मध्ये ध्यानाला उघड्या अंगावर ओले चीवर(अंग झाकण्या साठी वापरण्यात येणारा कपडा) घेऊन बसतात.अशा ठिकाणी सर्वसामान्य व्यक्ती बसली तर गाठून जाईल.एवढे थंड ठिकाण  त्या थंडीत हे भिखू ध्यान साधनेला बसतात.पण कोणत्याही प्रकारचा त्यांना त्रास होत नाही.हे मात्र वैदिकशस्त्राला आव्हानच समजावे लागेल.ते भिखू ध्यान साधनेच्या शक्तीने संपूर्ण शरीरावर ताबा मिळवतात.त्यांना असेही आढळून आले कि या ध्यान साधने मध्ये बसलेले बौद्ध भिखू या साधनेमध्ये कल्पना करतात कि संपूर्ण शरीर अग्नी सारखे तापले आहे.त्यांच्या  या कल्पनेनुसार अंग तापून जाते,व अंगावरील ओले चीवर सुकून जाते.या अनुभवातूनच डॉक्टर बेन्सन यांच्या लक्षात आले कि कोणतेही संकट नसताना फक्त कल्पना केल्याने आपल्या मेंदू मध्ये विचाराप्रमाणे रसायने पाझरतात.म्हणजेच एखाद्या गोष्टीला घाबरून आपला रक्तदाब वाढतो,किंवा लिंबुची नुसती कल्पना करण्याने सुधा तोंडामध्ये लाळ येते,चव वाटते.म्हणजेच मनामध्ये हि शांतता निर्माण होऊ शकते असे डॉ.बेन्सन यांना वाटायला लागले.या नुसार डॉ.बेन्सन यांनी त्यांचाकडे येणाऱ्या कित्येक रुग्णांना आनंद,शांतता,प्रसन्नता,वाटणाऱ्या दृशांची कल्पना करायला सांगत.त्यातून अनेक रुग्णांना चांगला फायदा होतो हे सिध्द झाले.वैज्ञानिक अभ्यासातून व संशोधनातून असे लक्षात आले कि मेंदूतील लिम्बिक सिस्टीम नावाचा भाग,भावनांशी संबंधित असतो.या मधील अमायगडाला हा अवयव सतत काहीना काही  प्रतिक्रिया करत असतो.या प्रतिक्रिया मुळे हायपोथलेमस नावाचा भागामध्ये काही रसायने तयार होतात.या मुळे जोर चढतो व काही वेळा मनामध्ये भीती,राग निर्माण होते.
            अमायगडालाच्या प्रतिक्रिया जेवढ्या जास्त तेवढ्या भावनांची गती जास्त होते.त्यामुळे अमायगडाला जास्त प्रमाणात प्रतिक्रिया करू लागतो.याच सवयी बदलण्यासाठी सजगता ध्यान(माईडफुलनेस) ची मदत होते.कधी आपला कोणाशी वाद झाला तर आपण भांडतो अथवा राग मनात दाबून ठेवतो.यातून आपले मन अस्वस्थ होते आणि आपल्याला मिळालेल्या प्रतिक्रिया मुळे आपली घुसमट होते.त्यातून मेंदूत गोंधळ होतो व मानसिक त्रास होतो.याचातून सावरण्यासाठी योग्य वेळी सजग/सावधान रहायला हवे.त्या मुळे सगळे भावनिक, मानसिक त्रास कमी होतील.या साठी सजगता ध्यान प्रशिक्षण गरजेचे आहे.आपल्या रोजचा सरावाने आपली चांगली सजगता वाढेल,व आपल्या भावना,विचार,आनंद,संवेदना,दु:ख,यांना सजगतेने/सावधानतेने पहाण्याची सवय लागेल.त्या मुळे आपला  अमायगडाला शांत राहील व त्याचा आकार कमी होईल.या सजगता ध्यानाने आपले मानसिक संतुलन चांगले राहील.म्हणूनच सजगता ध्यान आजच्या काळाची गरज आहे.
         आपल्या प्रतिक्रिया कळवा ,व अधिक माहितीसाठी संपर्क करा .

      -राहुल दळवी
 माईंडफुलनेस प्रशिक्षक

   *07066217153*
                  dalvirahul326@gmail.com

Comments

Popular posts from this blog

 भाग१ माईंडफुलनेस आणि व्यसन *"डिफॉल्ट मोड नेटवर्क" परिणाम व उपयोग*  *डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हणजे काय?* आपण जेंव्हा कोणत्याही प्रकारचे शारीरिक काम करत नसताना शांत बसलो असताना,आपण भूत,भविष्य, काळातील गोष्टींच्या विचार,कल्पना मध्ये सक्रीय होणे म्हणजे (DMN) डिफॉल्ट मोड नेटवर्क होय. याचा परिणाम जेवढा चांगला,तेव्हढाच दुष्परिणाम   *चांगला परिणाम.* आत्मचिंतन करणे, भविष्यातील योजना आखणे, सामाजिक व समाजातील कुटुंबातील नातेवाईक आप्तेष्ट यांच्या बद्दल चांगला विचार करणे,यासाठी महत्वाचा आहे. परंतु जास्त प्रमाणात सक्रिय DMN जास्त प्रमाणात विचार,चिंता, डिप्रेशन  सारख्या मानसिक आरोग्य वाढीसाठी घातक आहे.याचा (ADHD)"अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी" म्हणजे अवधान अस्थिरता आणि अतिक्रियाशीलता विकृती, तसेच Alzheimer's विकार म्हणजे स्मरणशक्ती कमी होणे,विचार आणि निर्णय क्षमता कमी होणे,वर्तनामध्ये बदल,सामाजिक कौशल्ये कमी होणे, अशा विकारांशी संबंध येऊ शकतो. अती व्यसनाधीन मित्रांमध्ये याचा खूप धोका जाणवतो,व्यसनी मित्रांमध्ये जास्त विचार करण्याची प्रवृत्ती(चिंता) एकांत राहणे, स्वतःमध्ये केंद्...

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन.सप्टेंबर १०.

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन               १० सप्टेंबर    जीवन खुप सुंदर आहे,त्याला आनंदाने जगाता यायला हवे! निसर्ग निर्मित प्राण्यांमध्ये सर्वांत बुध्दीमान प्राणी हा मनूष्य आहे.तरीही तोच आत्महत्याला बळी पडतो.याच्या सारखी भयानक परिस्थिती दुसरी नसेल असे वाटते. आपल्या आजूबाजूला अनेक सरपटणारे व सस्तन प्राणी आपण पहात असतो.माञ त्यातील एखाद्या सापाने किंवा कुञ्या-मांजराने आत्महत्या केली,असे कधी ऐकण्यात आले आहे का? नाही ना.कारण त्यांच्या मेंदूच्या वाढीमध्ये pre-frontal cortex भागाची वाढ झालेली नसल्या कारणाने त्यांना विचार करता येत नाही.चांगले वाईट समजत नाही. तोच pre-frontal cortex चा भाग(मोठा मेंदू)मानवाला निसर्गाकडून देणगी स्वरूपात मिळालेला आहे.त्यामुळेच मानूस विचार करतो,चांगले वाईटांची त्याला पारख कळते.तरीही आपण माञ त्याचा वापर करायला कमी पडतो.नको असणाऱ्या विचारांचे ओझे डोक्यावरती(मेंदूत साठवून)ठेवतो.चिंतन करणे,सोडून चिंता करतो.तणावयुक्त जीवन जगत असतो.त्यातूनच मानसिक समस्या उदभवायला लागतात.आणि आत्महत्या/चिड-चिड,रागासारखे विचार/भावना म...

व्हिज्युअलायझेशन

#कल्पना_ध्यान(व्हिज्युअलायझेशन ) व्हिज्युअलायझेशन  म्हटले की अनेकांच्या मनात एक जादू आसल्यासारखे वाटते.फक्त कल्पना करूण आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी आपले स्वप्न आपण पूर्ण करू अशा भ्रामक समजूती आपल्या समाजामध्ये दृढ झालेल्या आढळून येऊ लागल्या आहेत. एक विचार करा.फक्त कल्पना करण्यांनी आपल्याला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी मिळवता येतात का?कि त्याला ही प्रयत्नांची जोड द्यावी लागते.जेंव्हा याचे चिंतन कराल तेंव्हा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे सापडल्या शिवाय रहाणार नाहीत. आज अनेक मंडळी,#माईंडफुलनेस कार्यशाळा संदर्भात विचारत असताना.मला #व्हीज्युअलायझेशन हे कितपत उपयोगी आहे का? ते करायला हवे का? आम्ही #द_सिक्रेट हे पुस्तक वाचले,अनेक वेळा या विषयी ऐकले ही आहे.अनेक व्यक्ती यशस्वी झालेत ते कसे काय? #आपण_ते_पाहू_या! आपण दहावी/बारावी ला आहोत.आपल्याला येणाऱ्या बोर्ड परिक्षा मध्ये पास होण्याचे आहे. आणि आपण फक्त अभ्यास करण्याची कल्पना करत बसलो.व प्रत्यक्षात अभ्यास केलाच नाही तर बोर्ड परिक्षा पास होईल की नापास.आपण नक्कीच परिक्षेमध्ये शेवट हून पहिला नंबर काढलेला आसेल.व माञ आपण प्र...