ध्यान
भारतीय समाजामध्ये ध्यानाला एक वेगळे महत्व आहे.त्याचे अनेक अर्थ ही काढले जातात.काहींचा मते ध्यान ही मोक्ष प्राप्तीसाठी केली जाणारी साधना आहे.तर काहींचा मते अध्यात्मिक साधना आहे.याचे अनेक अर्थ जोडले गेले आहेत.उपासना,धर्म,अध्यात्म,अशी याची ओळख निर्माण झाली आहे.काही भारतीय संतानी याचा आप-आपल्या शब्दात प्रचार आणि प्रसार ही बराच केला आहे.२५०० वर्षा पूर्वी सिद्धार्थ बुद्धांनी आनापानसती ध्यानातून बुद्धत्व प्राप्त केले.अनेक संन्यासी/ग्रह्स्ती व्यक्तींना ध्यान शिकवले ही,त्याचा अनेक साधू-संत,ग्रह्स्तीनी जीवन आनंदी बनवण्यासाठी,दु:ख मुक्तीसाठी उपयोग करून घेतला आहे.याचे आज हि बौध्द भिक्खू उपयोग करताना दिसत आहेत.त्याच बरोबर ओशो यांनीही ध्यानाचा बराच प्रसार केला आहे.आज ही त्यांचा आश्रमात ध्यान शिबिरे घेतली जातात.तसेच आज संपूर्ण भारत व पाश्चिमात्य देशात,सत्यनारायण गोयंका गुरुजींनी ध्यानसाधनेचा प्रसार केला आहे.ज्याला आपण विपश्ना नावानी ओळखतो,ही ध्यानसाधना बुद्धांच्याकडूनच मिळाली आहे.जी भारतामधून लुप्त झाली होती.तीला पुन्हा भारतभूमीत रुजवण्याचे काम गोयंका गुरुजींनी केले.ते कार्य त्यांचा पश्चात आज ही विपश्ना सेंटर मध्ये चालू आहे.त्याच बरोबर महर्षी योगी यांनी भावातीत ध्यानाचा प्रसार भारता बरोबरच पाश्चिमात्य देशामध्ये केला आहे.महर्षी योगी यांनी १९९३ साली शास्त्रज्ञापुढे सिध्द केले आहे.त्यांनी ४००० शिक्षकांना वाशिंग्टन डीसीमध्ये बोलावून त्यांना एक महिना ध्यानाभ्यास करायला सांगितले.त्यामुळे त्या शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले.असे आढळून आले,याचे कारण शास्त्रज्ञांना कळले नाही.म्हणून त्यांनी याला "महर्षी इफेक्ट"असे नाव दिले गेले.त्यांनी ध्यानामधील ताकद दाखवून दिली.आपण आपली प्रगती ध्यानामुळे कमी श्रमात साधू शकतो.गरज आहे ती फक्त ध्यानातून स्व:ताचा शोध घेण्याची.
#ध्यान_समाज_गैरसमज -: ध्यान या विषयावरती आज बरेचसे संशोधन चालू आहे.ध्यानाला एक थेरपीचे स्वरूप निर्माण होताना दिसत आहे.ध्यान ह्या विषयावरती बरेच लिखाण झाले आहे.ते आपण पुढे पहाणारच आहोत.याच ध्यान साधनेचे भारतीय लोकांमध्ये अनेक गैरसमज दिसून येतात.ते नाहीशे होणे ही फार म्हत्वाचे आहे.ध्यानसाधना म्हणजे दैवी प्राप्तीसाठी व चमत्कारासाठी करण्याची साधना असा अनेकांचा मनामध्ये समाज निर्माण झालेला दिसून येतोय.आज एखाद्या व्येक्तीला ध्यान करण्याविषयी सांगितले असता त्यांच्याकडून येणाऱ्या प्रतिक्रिया काही मजेशीर वाटतात.त्यांना ध्यानसाधना ही संन्यासी व्यक्तींनी करावे,आपण संसारिक लोक आत्ताच कुठे या मार्गाला लागावे.वय झाल्यानंतर म्हातारपणी पाहू ,ध्यानाचा गोष्टी असे बरेचदा ऐकावे लागते.तर काहींच्या मते ध्यान हे फक्त मोक्ष प्राप्तीसाठी करावी लागणारी विद्या असा हि समज आहे.तर काहींना आध्यात्मात घेवून जाणारी विद्या असे वाटते.असे अनेक गैरसमज अनेकांचा मानसिकतेनुसार निर्माण झालेले आपल्याला पहायला मिळत असतील.आपण या ध्यानसाधनेला एका चौकटी पर्यंत मर्यादित ठेवून पहात आहोत. आज काही बौध्द,ख्रिश्चन,हिंदू,धर्मामध्ये सांगितलेल्या ध्यानसाधनेवरती पाश्चिमात्य देशामध्ये बरेच संशोधन झाले आहे.व चालू आहे.तेही आपण पुढे पहाणार आहोत.ध्यानसाधना ही प्रत्येकाने करायला हवी अशी साधना आहे.
#ध्यान_म्हणजे_काय?-: ध्यान म्हणजे एकरूप होणे.किवा एखाद्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करणे.आपण अनेक ठिकाणी एकरूप झालेलो आसतो.म्हणजे ध्यानस्थ होतो.उदा -: मंदिरा मध्ये देवाची पूजा करत असताना ही आपण त्या पूजेमध्ये तल्लीन होतो.म्हणजे ध्यानस्थ होतो.विद्यार्थी अभ्यास करत असताना,त्या विषयामध्ये एकरूप होवून अभ्यास करतात.म्हणजे ध्यानस्थ होतात.संमोहन(हिप्नोटीझम) मध्ये काही त्राटक विद्या म्हणून.बिंदू त्राटक,सूर्य त्राटक,करायला सांगतात.म्हणजेच त्या प्रतिबिंबावर एकरूपता साधतात.म्हणजे ध्यानस्थ होतात.आपण कधी-कधी सहज बोलून जातो,कुठे आहे लक्ष तुझे इकडे ध्यान दे जरा.म्हणजेच आपण एखाद्या गोष्टीत एकरूप होऊन ती गोष्ट करणे,म्हणजे ध्यानस्थ होणे.म्हणजे ध्यान होय.
-राहुल दळवी
माईंडफुलनेस प्रशिक्षक
07066217153

Comments
Post a Comment