Skip to main content

नोसिबो व प्लासिबो

नोसिबो(Nocibo)व प्लासिबो(placebo)
सजगध्यानाची
ओळख

      आपण आपल्या आजूबाजूला तर कधी स्वतःहा अनेक चमत्कारिक आजार बरे झालेले पाहिले आसतील किंवा अनुभवले ही आसतील.अनेक व्यक्तींना प्रश्न पडलेले आसतील.माझ्या वरती कोणीतरी करणी केलेली आहे.मुठ मारली आहे.याच्यामुळे मला सतत काहीना-काही ञास होतो,माझे कामावरती लक्ष लागत नाही.साहेब सारखे ओरडतात.आमच्या नवरा-बायकोचे चांगले चाले होते.आता आजिबात पटत नाही.आमचे चांगले चालेले कोणाला बघवत नाही.आमच्या  संसाराला कोणाची तरी दृष्ट लागलेली दिसते.असे अनेक विचार व सौम्य मानसिक विकार(Neurosis)विकृती निर्माण होतात.किंवा एखाद्या वेळी डॉक्टरनी चुकीचा रिपोर्ट/सल्ला दिल्यामुळे आपण आपले शारीरीक व मानसिक रिपोर्ट चांगले असताना ही त्या विचारां प्रमाणे,रिपोर्ट प्रमाणे विचार करायला लागतो.त्या नुसार आपली मानसिक स्थिती बनते.म्हणजे आपल्या चुकीच्या विचारानी शरीरातील रसायने त्यानुसार बदलत रहातात.याला "नोसिबो"(Nocebo)
म्हणतात.

आपण एखाद्याला औषधी स्वरूपा मध्ये हाजमोलाच्या किंवा इतर गोळ्या देतो. अथवा पातळ औषधी समजून फक्त पाणी देतो.व आपल्या वरती विश्वास ठेवून त्या व्यक्ती ते औषध आहे असे समजून घेतात. व आजारातून बरे होतात. (असे अनेक प्रयोग मी स्वतःहा ही केलेले आहेत).यालाच "प्लासिबो(placebo)
म्हणतात.

    असे कसे घडते,तर आपण आपल्या मनाला जसे समजावू तसे आपले मन समजते व मेंदू मध्ये आपल्या समजून घेण्याच्या प्रतिक्रिया नुसार रसायनांची प्रक्रिया चालू होते.जशा प्रतिक्रिया तशी मेंदूची/मनाची स्थिती रहाते.विचारांचा कल्लोळ असेल तर मेंदू मध्ये युद्धस्थिती निर्माण होते.विचार शांत आसतील तर मेंदू मध्ये शांतता स्थिती निर्माण होते.

  आपल्या सजगता ध्यानाने आपल्या मनामध्ये येणाऱ्या विचारांची/भावनांची समजूतदार प्रतिक्रिया निर्माण होते.आपल्या जीवनावर,वर्तनावर,त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. या साठी प्रत्येक व्यक्तीने सजगता ठेवायला हवी. सजगतेने कृती करायला हवी. यामुळे आपले जीवन आनंदी होईल.


       -राहुल दळवी
   माईंडफुलनेस प्रशिक्षक
        07066217153

Comments

Popular posts from this blog

 भाग१ माईंडफुलनेस आणि व्यसन *"डिफॉल्ट मोड नेटवर्क" परिणाम व उपयोग*  *डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हणजे काय?* आपण जेंव्हा कोणत्याही प्रकारचे शारीरिक काम करत नसताना शांत बसलो असताना,आपण भूत,भविष्य, काळातील गोष्टींच्या विचार,कल्पना मध्ये सक्रीय होणे म्हणजे (DMN) डिफॉल्ट मोड नेटवर्क होय. याचा परिणाम जेवढा चांगला,तेव्हढाच दुष्परिणाम   *चांगला परिणाम.* आत्मचिंतन करणे, भविष्यातील योजना आखणे, सामाजिक व समाजातील कुटुंबातील नातेवाईक आप्तेष्ट यांच्या बद्दल चांगला विचार करणे,यासाठी महत्वाचा आहे. परंतु जास्त प्रमाणात सक्रिय DMN जास्त प्रमाणात विचार,चिंता, डिप्रेशन  सारख्या मानसिक आरोग्य वाढीसाठी घातक आहे.याचा (ADHD)"अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी" म्हणजे अवधान अस्थिरता आणि अतिक्रियाशीलता विकृती, तसेच Alzheimer's विकार म्हणजे स्मरणशक्ती कमी होणे,विचार आणि निर्णय क्षमता कमी होणे,वर्तनामध्ये बदल,सामाजिक कौशल्ये कमी होणे, अशा विकारांशी संबंध येऊ शकतो. अती व्यसनाधीन मित्रांमध्ये याचा खूप धोका जाणवतो,व्यसनी मित्रांमध्ये जास्त विचार करण्याची प्रवृत्ती(चिंता) एकांत राहणे, स्वतःमध्ये केंद्...

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन.सप्टेंबर १०.

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन               १० सप्टेंबर    जीवन खुप सुंदर आहे,त्याला आनंदाने जगाता यायला हवे! निसर्ग निर्मित प्राण्यांमध्ये सर्वांत बुध्दीमान प्राणी हा मनूष्य आहे.तरीही तोच आत्महत्याला बळी पडतो.याच्या सारखी भयानक परिस्थिती दुसरी नसेल असे वाटते. आपल्या आजूबाजूला अनेक सरपटणारे व सस्तन प्राणी आपण पहात असतो.माञ त्यातील एखाद्या सापाने किंवा कुञ्या-मांजराने आत्महत्या केली,असे कधी ऐकण्यात आले आहे का? नाही ना.कारण त्यांच्या मेंदूच्या वाढीमध्ये pre-frontal cortex भागाची वाढ झालेली नसल्या कारणाने त्यांना विचार करता येत नाही.चांगले वाईट समजत नाही. तोच pre-frontal cortex चा भाग(मोठा मेंदू)मानवाला निसर्गाकडून देणगी स्वरूपात मिळालेला आहे.त्यामुळेच मानूस विचार करतो,चांगले वाईटांची त्याला पारख कळते.तरीही आपण माञ त्याचा वापर करायला कमी पडतो.नको असणाऱ्या विचारांचे ओझे डोक्यावरती(मेंदूत साठवून)ठेवतो.चिंतन करणे,सोडून चिंता करतो.तणावयुक्त जीवन जगत असतो.त्यातूनच मानसिक समस्या उदभवायला लागतात.आणि आत्महत्या/चिड-चिड,रागासारखे विचार/भावना म...

व्हिज्युअलायझेशन

#कल्पना_ध्यान(व्हिज्युअलायझेशन ) व्हिज्युअलायझेशन  म्हटले की अनेकांच्या मनात एक जादू आसल्यासारखे वाटते.फक्त कल्पना करूण आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी आपले स्वप्न आपण पूर्ण करू अशा भ्रामक समजूती आपल्या समाजामध्ये दृढ झालेल्या आढळून येऊ लागल्या आहेत. एक विचार करा.फक्त कल्पना करण्यांनी आपल्याला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी मिळवता येतात का?कि त्याला ही प्रयत्नांची जोड द्यावी लागते.जेंव्हा याचे चिंतन कराल तेंव्हा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे सापडल्या शिवाय रहाणार नाहीत. आज अनेक मंडळी,#माईंडफुलनेस कार्यशाळा संदर्भात विचारत असताना.मला #व्हीज्युअलायझेशन हे कितपत उपयोगी आहे का? ते करायला हवे का? आम्ही #द_सिक्रेट हे पुस्तक वाचले,अनेक वेळा या विषयी ऐकले ही आहे.अनेक व्यक्ती यशस्वी झालेत ते कसे काय? #आपण_ते_पाहू_या! आपण दहावी/बारावी ला आहोत.आपल्याला येणाऱ्या बोर्ड परिक्षा मध्ये पास होण्याचे आहे. आणि आपण फक्त अभ्यास करण्याची कल्पना करत बसलो.व प्रत्यक्षात अभ्यास केलाच नाही तर बोर्ड परिक्षा पास होईल की नापास.आपण नक्कीच परिक्षेमध्ये शेवट हून पहिला नंबर काढलेला आसेल.व माञ आपण प्र...